घरताज्या घडामोडीलोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण अशी सरकार आणि मंत्र्यांची रीत -...

लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण अशी सरकार आणि मंत्र्यांची रीत – प्रविण दरेकर

Subscribe

कोरोना, ओमायक्रोनचा प्रसार होत असेल तर कडक निर्बंध लादले पाहिजेत. काळजी घेतलीच पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. परंतु लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशी राज्य सरकार आणि मंत्र्यांची रीत झाली आहे, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

सरकार दोन वर्षे सत्तेवर टिकले

दरेकर पुढे म्हणाले की, कोरोनाला वरदान समजत हे सरकार दोन वर्षे सत्तेवर टिकले, कुठल्याही प्रकारची विकासकामे, लोकांच्या हिताची काळजी घेतली नाही. तसे ओमिक्रॉनची सत्ता टिकवण्याला वरदान आहे, असे समजून केवळ निर्बंध नको तर लोकांसाठी उपाययोजनाही असायला हव्यात. सरकारी पक्षाचे मेळावे, सरकारी पक्षाचे कार्यक्रम, मालवण महोत्सव किंवा वंडरलँड स्वत: पर्यावरण मंत्री करत असतील तर त्यांना दुसऱ्यांना तसे सांगण्याचा नैतिक अधिकार पोहोचत नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

हिंदुत्ववादी विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न

नसीरुद्दीन शाहसारख्या अभिनेत्याने जातीय विद्वेष निर्माण करण्याचे काम करू नये. हिंदुस्तानात अशा प्रकारे ताकद दाखवण्याचे दुर्दैवी काम कोणी करू नये. जेणेकरून जातीय तेढ निर्माण होईल. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांना आव्हान देण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला जशास ते उत्तर देण्यात येईल असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे की, मोघलांचे राष्ट्रनिर्मितीतले योगदान विसरले जाते. मोघलांनीच ऐतिहासिक स्मारके निर्माण केली. आम्ही मुस्लिम २० कोटी आहोत. आम्ही २० कोटी लढू. त्यावर दरेकर यांनी हा इशारा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगद्याचा २ किलोमीटर टप्पा पूर्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -