घरमनोरंजनPushpa The Rise : ३०० कोटींचा गल्ला जमवणारा 'पुष्पा' आता ओटीटीवर

Pushpa The Rise : ३०० कोटींचा गल्ला जमवणारा ‘पुष्पा’ आता ओटीटीवर

Subscribe

7 जानेवारीपासून हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चाहत्यांमध्येही या सिनेमाची कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाच्या प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होणार आहे. 7 जानेवारीपासून हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

पुष्पा हा सिनेमा 17 डिसेंबर रोजी देशभरातील अनेक चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 19 व्या दिवशीही या चित्रपटाची कमाई थांबण्याचे नाव घेत नाही. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अशातच सिनेमा आता ओटीटीवरही प्रदर्शित होणार असल्याची माहिती अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने ट्वीट करत दिली आहे. पुष्पा सिनेमाच्या पोस्टरचा फोटो शेअर करत लिहिले की, तो लढेल..तो धावेल…तो उडी मारेल…पण तो झुकणार नाही. 7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by amazon prime video IN (@primevideoin)

- Advertisement -

हिंदी व्हर्जनमध्येही हा सिनेमा चांगली कमाई करुन लवकरचं ७५ कोटींचा टप्पा पार करणार आहे. आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी हा चित्रपट लवकरचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील अल्लू अर्जुनच्या अभिनयाचेदेखील चाहत्यांकडून विशेष कौतुक केले जातेय. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 71 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर केवळ तीन दिवसात 173 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. संपूर्ण देशभरात एकाच वेळी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, समंथा प्रभू आणि अल्लू अर्जुन या तिघांचा अभिनय प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीस पडतोय.

- Advertisement -

‘पुष्पा: द राइज’ हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -