घरताज्या घडामोडी'Corona'वर मात करण्यासाठी मुंबई सुसज्ज ; माहुल ऑक्सिजन प्लांटचे 'Aaditya Thackeray' यांच्या...

‘Corona’वर मात करण्यासाठी मुंबई सुसज्ज ; माहुल ऑक्सिजन प्लांटचे ‘Aaditya Thackeray’ यांच्या हस्ते लोकार्पण

Subscribe

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीत मुंबई महानगरपालिका सुसज्ज झाली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याने, पूर्व उपनगरातील माहुल परिसरात भारत पेट्रोलियम कंपनी आणि मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट चे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ( व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) करण्यात आले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीत मुंबई महानगरपालिका सुसज्ज झाली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याने, पूर्व उपनगरातील माहुल परिसरात भारत पेट्रोलियम कंपनी आणि मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट चे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ( व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) करण्यात आले. तसेच महालक्ष्मी येथील ऑक्सिजन प्लांटचे देखील लोकार्पण करण्यात आले. या प्लांट मुळे मुंबईसह आसपासच्या मेट्रो रिजन मधील वैद्यकीय ऑक्सिजन च्या मागणीचा प्रश्न सुटणार असल्याची माहिती खासदार शेवाळे यांनी दिली.यावेळी खासदार शेवाळे यांच्यासह खासदार अरविंद सावंत, पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त पालिका आयुक्त वेल्लरसू आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

“आजमितीला मुंबईत कार्यान्वित होणारे हे दोन ऑक्सिजन प्लांट म्हणजे कोणत्याही संकटाविरोधात लढण्याच्या मुंबई स्पिरीटचं अनोखं उदाहरण आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका सज्ज आहे, मात्र नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोना विरोधातील लढाईत सक्रिय सहभाग द्यायला हवा.” अशा शब्दांत या लोकार्पण सोहळ्यात पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या आधीच राज्य सरकारच्या वतीने ‘ मिशन ऑक्सिजन ‘ ची घोषणा करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील मोठ्या कंपन्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत भारत पेट्रोलियम कंपनीने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने या जंबो ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली असून या प्लांट मधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती केली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने कोरोना विरोधातील लढाईसाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार सर्वतोपरी सज्ज आहे. माहुल येथील जंबो प्लांट मुळे मुंबई उपनगर आणि आसपासच्या मेट्रो रिजन मधील वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी पूर्ण होऊ शकेल. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत उभारण्यात आलेल्या प्लांट साठी भारत पेट्रोलियम आणि मुंबई महानगर पालिकेचे आभार मानतो.
– खासदार राहुल शेवाळे

- Advertisement -

माहुल जंबो ऑक्सिजन प्लांटची वैशिष्टे

  • माहुल, चेंबूर येथे पालिकेच्या जागेवर प्लांट उभारण्यात आला आहे.
  • व्ही पी एस ए टेक्नॉलॉजी द्वारा ऑक्सिजन निर्मिती
  • भारत पेट्रोलियम च्या वतीने एक आणि पालिकेच्या वतीने दोन ऑक्सिजन कॉम्प्रेसर यंत्रणा बसविण्यात आली आहे.
  • प्रकल्पाचा खर्च अंदाजे 15 कोटी रुपये.
  • 14 लिटर चा एक याप्रमाणे तासाला सुमारे 50 सिलेंडर
  •  दिवसाला सुमारे 1500सिलेंडर चा पुरवठा केला जाणार.

हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! कोरोना रुग्णसंख्या 1939 ने घटली, तर १५ हजार रुग्णांना डिस्चार्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -