घरमहाराष्ट्रएल्गार परिषद प्रकरण : अरुण परेरा, गोन्साल्विसला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

एल्गार परिषद प्रकरण : अरुण परेरा, गोन्साल्विसला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Subscribe

नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या अरुण परेरा आणि गोन्साल्विस यांना पुणे न्यायायलयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या अरुण परेरा आणि गोन्साल्विस यांना पुणे न्यायायलयात आज, शनिवारी हजर करण्यात आले. यावेळी त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वेरनोग गोन्साल्विस, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी काल फेटाळून लावला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी या निर्णयाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, सुधा भारद्वाज यांना हरियाणामधील फरियादाबाद येथील त्यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना आज दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. पुण्याच्या विशेष न्यायालयाने तिघांना जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी गोन्साल्विस, अॅड. परेरा यांनी काल, शुक्रवारी सायंकाळी अटक केली होती. भारद्वाज, परेरा आणि गोन्साल्विस यांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वला पवार यांनी तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. मात्र युक्तीवादानंतप काल या तिघांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -