घरताज्या घडामोडीCorona : विळखा घट्ट ! सर्वोच्च न्यायालयातील १० न्यायाधीश, ३० टक्के कर्मचाऱ्यांना...

Corona : विळखा घट्ट ! सर्वोच्च न्यायालयातील १० न्यायाधीश, ३० टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Subscribe

देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सुप्रीम कोर्टातच कोरोनाने आपला विळखा घट्ट केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील एकुण १० न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयातील ३० टक्के कर्मचाऱ्यांनाही कोरोनाच्या संसर्गाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हलकी लक्षणे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर संसर्ग वाढलेल्या कर्मचाऱ्यांना हॉस्पलिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशनचा पर्याय देण्यात आला आहे. आतापर्यंत दोन न्यायाधीशांनी कोरोनावर उपचार घेऊन कामाला सुरूवात केली आहे. त्या न्यायाधीशांमध्ये एम जोसेफ आणि पीएस नरसिंहा हे कोरोनातून बरे होऊन कामाला लागले आहेत, अशी माहिती आहे.

- Advertisement -

डॉ श्यामा गुप्ता यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारची आरोग्य सेवेची चिकित्सा टीम कोरोनाचा संसर्ग झालेल्या न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी २४ तास काम करत आहे. ही टीम दैनंदिन पातळीवर १०० ते २०० आरटीपीसीआर चाचण्या करत आहे. या चाचण्यांमध्ये संसर्गाचा धोका हा ३० टक्के धोक्याच्या पातळीचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सर्वोच्च न्यायालयात वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. सर्वोच्च न्यायलयात सध्या अनेक महत्वपूर्ण प्रकरणे आहेत, ज्या प्रकरणावर न्यायालयाकडून निकाल येणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -