घरताज्या घडामोडीखासदार विनायक राऊतांना एकाच दिवसात १५ वेळा जीवे मारण्याची धमकी, आरोपी राणे...

खासदार विनायक राऊतांना एकाच दिवसात १५ वेळा जीवे मारण्याची धमकी, आरोपी राणे समर्थक असल्याचा आरोप

Subscribe

खासदार विनायक राऊत यांना धमकी देणारा तरुण रत्नागिरीत होता. तरुण सध्या मुंबईत वास्तव्यास असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना नेत्यांना धकमी देण्याचे प्रकार वाढले आहेत. कोकणातील शिवेसनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांना एकाच दिवसात १५ वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा आरोपी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समर्थक असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. विनायक राऊत यांनी धमकी दिली असल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली होती. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. तो आरोपी राणे समर्थक असल्यामुळे आपल्याला धमकी देण्यात आली असल्याचे विनायक राऊत म्हणाले. यापूर्वी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनासुद्धा धमकीचा फोन आला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. यामध्ये बऱ्याच जागा राणेंच्या हातून गेल्या असून त्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. यामुळे राणे समर्थक असल्याचे सांगून एक व्यक्ती आपल्या शिवीगाळ करतोय आणि मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार खासदार विनायक राऊत यांनी पोलिसांमध्ये केली होती. या आरोपीने एकाच दिवसात १५ वेळा धमकी दिली यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तत्काळ शोध सुरु करुन तरुणाला अटक केली आहे.

- Advertisement -

खासदार विनायक राऊत यांना धमकी देणारा तरुण रत्नागिरीत होता. तरुण सध्या मुंबईत वास्तव्यास असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. खासदार विनायक राऊत हे कोकणातील कामांवरुन भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात वक्तव्य करत असता. राऊतांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राणे समर्थकांमध्ये संताप पसरला आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वारंवार भेट घेतो. गडकरी ठेकेदारांना आदेश देतात मग ते काम सुरु करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ठेकेदारांना आदेश दिले असतानाही काम सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते २७ जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : माझगावमधील वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -