घरमनोरंजनबॉलीवूडकरांपासून सावध राहा, कंगनाचा साऊथ स्टार्सला इशारा

बॉलीवूडकरांपासून सावध राहा, कंगनाचा साऊथ स्टार्सला इशारा

Subscribe

सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य चित्रपटांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषांमधील चित्रपट ज्यापद्धतीने लोकप्रिय होत आहेत ते पाहणे अभूतपूर्व आहे. तेलगू चित्रपट ‘पुष्पा- द राइज इन’ च्या हिंदी व्हर्जनच्या यशाने अनेकांनाच आश्चर्यचकित केले आहे. यातच कंगना रानौतने दाक्षिणात्य चित्रपटांच्या प्रचंड यशावर आपले मत व्यक्त करत यामागे तीन कारणे सांगितली आहेत. सध्या साऊथ चित्रपटांचे देशभरातून खूप कौतुक होत आहे. मात्र कंगनाने या साऊथ चित्रपट निर्मात्यांना बॉलिवूडपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये यामागची कारणं सांगितली आहेत. सध्या भारतीय चित्रपट सृष्टीत साऊथ कंटेंट आणि सुपरस्टार्सची खूप क्रेझ आहे. यामागे कंगनाने पहिले कारण सांगितले की, साऊथ चित्रपटांच्या आशयाची पाळेमुळे भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत. दुसरे कारण म्हणजे, ते लोकं त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या नात्यावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव दिसून येत नाही. तसेच ते भारतीय समजुतींना अनुरूप असतात. या लोकांची कामाप्रती असलेली तळमळ आणि समर्पण याची कोणी बरोबरी करु शकत नाही.

- Advertisement -

यासोबत कंगनाने लिहिले की, बॉलिवूड त्यांना भ्रष्ट करू शकत नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. कंगनाचा मागील चित्रपट ‘थलायवी’ हा तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या जीवनावर आधारित थलायवी या चित्रपटाची पटकथा केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती आणि दिग्दर्शन एएल विजय यांनी केले होते.

- Advertisement -

‘हे’ दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार आहेत

यावर्षी दक्षिणेतील अनेक मोठे चित्रपट एकाच वेळी हिंदीतही प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये राम चरण-एनटीआर जूनियरचा ‘आरआरआर’, प्रभासचा ‘राधे श्याम’, यशचा ‘केजीएफ चॅप्टर 2’, विजय देवरकोंडाचा ‘लिगर’ आणि अजित कुमारचा ‘वलिमाई’ यांचा समावेश आहे. यातील ‘आरआरआर’ आणि ‘राधे श्याम’ हे मूळचे तेलुगु चित्रपट आहेत, तर ‘KGF Chapter 2’ हा कन्नड चित्रपट आहे. त्याचबरोबर ‘लिगर’ हा हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट आहे. तर ‘वलिमाई’ हा तमिळ चित्रपट आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांचे बॉलीवूड कनेक्शन

बॉलिवूड स्टार्स अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनी ‘आरआरआर’ मध्ये काम केले आहे. त्याच वेळी, संजय दत्त आणि रवीना टंडन ‘केजीएफ चॅप्टर 2’ मध्ये झळकणार आहेत. तर ‘लिगर’मधून करण जोहर विजय देवरकोंडाला हिंदी सिनेमात लॉन्च करत आहे. तर अनन्या पांडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ‘वलीमाई’मध्ये हुमा कुरेशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -