घरक्रीडाAFC Women's Asian Cup: 12 खेळाडूंना कोरोनाची लागण, एएफसी आशिया चषकातून भारतीय...

AFC Women’s Asian Cup: 12 खेळाडूंना कोरोनाची लागण, एएफसी आशिया चषकातून भारतीय संघ बाहेर

Subscribe

भारतासाठी सामना महत्त्वाचा होता. परंतु सामना रद्द केला असल्यामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

एएफसी महिला आशिया चषकातून भारतीय संघाला माघार घ्यावी लागली आहे. संघातील १२ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ खेळाडू जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये स्पर्धेसाठी संघ १३ खेळाडूंची नावे देण्यास असमर्थ राहिला आहे. भारतीय फुटबॉल संघाला चीनी तैपेईविरुद्ध सामना सुरु होण्यापूर्वीच रद्द करावा लागला आहे. भारतीय महिला संघाने स्पर्धेतून माघार घेतली असून सर्व सामने रद्द करण्यात आली असल्याची माहिती फुटबॉल महासंघाने दिली आहे.

चीनी तैपेईचा संघ मैदानावर सामन्यापूर्वीची तयारी करत होता. परंतु भारतीय संघातील एकही सदस्य मैदानावर दिसत नव्हता. भारताचा बुधवारी अंतिम गट सामना चीनविरुद्ध होणार होतो परंतु तो आता होणार नसल्याची शक्यता आहे. भारतीय संघाकडे खेळवण्यासाठी पुरेसे खेळाडू नाहीत. ३० जानेवारीला नॉकआउट फेरी सुरु होणार आहे. यामुळे स्पर्धेच्या आयोजकांना स्पर्धेच्या वेळापत्रकात फेरबदल करणं अशक्य होईल.

- Advertisement -

आशिया फुटबॉल महासंघाने सांगितले की, स्पर्धेच्या नियमातील कलम ४.१ मध्ये असे नमूद केले आहे की जर एखाद्या संघाला सामन्यासाठी जमले नाही तर तो संघ स्पर्धेतून माघार घेईल. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी असे म्हणाले आम्ही तेवढेच निराश झालो आहोत जेवढा देश यावेळी या प्रकारामुळे झाला असेल. परंतु खेळाडूंचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत तडजोड करता येणार नाही. सर्व खेळाडू आणि संघाचे अधिकारी लवकरात लवकर कोरोनामुक्त होवो आणि त्यांची प्रकृती सुधारावी अशी आमची इच्छा आहे. खेळाडूंना एआयएफएफ आणि एएफसीचा पूर्ण पाठिंबा असेल.

भारताची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी हुकली

भारतीय महिला फुटबॉल संघातील १२ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. तसेच २ खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे चीनी तैपेईविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी १३ खेळाडू उपलब्ध झाले नाही. यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. यामुळे भारताचे उपांत्यपूर्व फेरीत जाण्याची संधी हुकली आहे. भारतासाठी सामना महत्त्वाचा होता. परंतु सामना रद्द केला असल्यामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Ind Vs Sa : कर्णधारपदाच्या वादामुळे टीम इंडियाला धक्का?, आफ्रिका दौऱ्यात लाजीरवाणी कामगिरी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -