घरक्रीडाLasith Malinga is back: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर लसिथ मलिंगा प्रशिक्षकांच्या भूमिकेत पुनरागमन करणार

Lasith Malinga is back: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर लसिथ मलिंगा प्रशिक्षकांच्या भूमिकेत पुनरागमन करणार

Subscribe

श्रीलंका संघ फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. परंतु श्रीलंकेच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी गुडन्यूज म्हणजे श्रीलंकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या मालिकेच्या निमित्ताने प्रशिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अनेक महिन्यांनंतर त्याचं संघात पुनरागमन होणार असल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

त्रिफळा उडवण्याची धमक असणारा खेळाडू

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी लसिथ मलिंगाची गोलंदाजीसाठी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केलीय. परंतु बोर्डाने प्रसिद्धपत्रक जाहीर करत लिहिलंय की, मलिंगाला थोड्या काळासाठी स्पेशलिस्ट प्रशिक्षकाच्या रूपात नियुक्त करण्यात आले आहे. श्रीलंकन गोलंदाजांना रणनीती तयार करण्यासाठी मलिंगाची मदत होणार आहे. मलिंगाचा अनुभव सध्याच्या वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण भल्याभल्या दिग्गज खेळाडूंना गारद करणारा आणि त्रिफळा उडवण्याची धमक असणारा खेळाडू म्हणजे लसिथ मलिंगा.

- Advertisement -

मी माझा अनुभव शेअर करण्यासाठी उत्सुक

श्रीलंका संघात अनेक गुणवंत गोलंदाज असल्यामुळे मी माझा अनुभव आणि विचार त्यांच्यासोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहे, असं लसिथ मलिंगा म्हणाला. दरम्यान, ११ फेब्रवारीपासून ऑस्ट्रेलियामध्ये श्रीलंका संघ पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. तसेच श्रीलंकेच्या विजयासाठी प्रशिक्षकाची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे.

- Advertisement -

टी-२० मालिकेसाठी असा असेल उभय संघ –

दसुन शनाका, अविष्का फर्नान्डो, पथुम निसांका, चरिथ असालंका, धनुष्का गुणातिलका, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, चमिका करुणारत्ने, वानेंदु हसारंगा, लाहिरु कुमारा, नुआन तुषारा, दुष्मंता चमीरा, जनिथ लियानागे, कामिल मिशारा, रमेश मेंडिस, महेश तीक्षणा, जैफरी वैंडरसे, प्रवीण जयाविक्रमा, शिरान फर्णाण्डो, बिनुरा फर्णाण्डो.

मलिंगाची कारकीर्द काय ?

लसिथ मलिंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००४ साली कारकिर्दीला सुरूवात झाली. त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरूवात केली. जुलै २००४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने पदार्पण केलं. २०१० मध्ये मलिंगाने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. जुलै २०१९ मध्ये बांगलादेश विरूद्ध अखेरची वनडे मालिका मलिंगा खेळला होता. आयपीएलमध्येही मलिंगाने उत्त्कृष्ट गोलंदाजीच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सला अनेक विजय मिळवून दिले आहेत.


हेही वाचा : IND vs WI ODI: वेस्टइंडिज विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वनडे आणि टी-२० सिरीजसाठी टीम सज्ज


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -