घरक्रीडाIND vs WI ODI: वेस्टइंडिज विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वनडे आणि...

IND vs WI ODI: वेस्टइंडिज विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वनडे आणि टी-२० सिरीजसाठी टीम सज्ज

Subscribe

वेस्टइंडिज विरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाने संघाची घोषणा केली आहे. त्यामुळे वेस्टइंडिज टीम आता लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया आणि वेस्टइंडिज या दोन संघांमध्ये वनडे आणि टी-२० सीरीज खेळली जाणार आहे. दोन्ही सीरीजसाठी बीसीसीआयकडून १८ सदस्यीय टीम इंडिया संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं पुन्हा एकदा संघात पुनरागमन झालं आहे. भारतीय निवडक समित्यांनी वेस्टइंडिज विरूद्ध होणाऱ्या सीरीजसाठी दोन फॉरमॅटचा संघ निवडला आहे.

सीरीजमध्ये टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. तर आर. अश्विनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लिगच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे रवी बिश्नोईला निवडकर्त्यांनी दोन्ही फॉरमॅटमध्ये संधी दिली आहे. ऋषभ पंतला दोन्ही सीरीजमध्ये संधी देण्यात आली आहे. तर वेगवान फलंदाज बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

अशी आहे टीम इंडिया

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि आवेश खान

- Advertisement -

टी-२० सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान आणि हर्षल पटेल.


हेही वाचा : Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निर्भया पथकाचे उद्घाटन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -