घरमनोरंजनराखी सावंत पैसे आणि सेक्सला हपापलेली - तनुश्री दत्ता

राखी सावंत पैसे आणि सेक्सला हपापलेली – तनुश्री दत्ता

Subscribe

तनुश्री दत्ता ही लेस्बियन असून तिने माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप, नुकताच राखी सावंतनने केला होता.

सध्या #Metoo च्या वादामुळे खऱ्या अर्थाने चर्चेत आलेली दोन नावं म्हणजे राखी सावंत आणि तनुश्री दत्ता. ‘तनुश्री लेसबियन असून तिने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला आहे’, असा गंभीर आरोप नुकताच राखी सावंतने केला होता. एक पत्रकार परिषद घेत राखीने तनुश्री ही लेसबियन आणि ड्रग अॅडिक्ट असल्याचा तसंच तिने आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर तनुश्रीने राखीवर केलेला १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा फेटाळून लावत, उलट राखीनेच तिच्याविरुद्ध ५० कोटींचा दावा केला. राखीच्या या नाट्यमय आरोपांमुळे #Metoo ला एक वेगळं वळण मिळालं होतं. तनुश्रीवर लवण्यात आलेल्या या गंभीर आरोपावर ती काय बोलणार याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, अखेर तनुश्रीने आता या आरोपावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तनुश्रीने आपलं मौन सोडत राखीवर पुन्हा एकदा तोफ डागली. एका खासगी मुलाखतीमध्ये बोलतेवेळी तनुश्री म्हणाली, ‘राखी करत असलेले सर्व आरोप हे खोटे असून मी कधी ड्रग्ज किंवा दारूला हातही लावलेला नाही आणि मी लेसबियन तर मुळीच नाही. राखी ही खोटारडी बाई असून पैसे आणि सेक्सला हापापलेली आहे.’ तनुश्रीच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ‘मीटू’ एका नव्या वळणावर येऊन ठेपलं आहे.


वाचा: राखी म्हणतेय, ‘लग जा गले’

काय म्हणाली तनुश्री?

मुलाखतीदरम्यान तनुश्री म्हणाली, मी ड्रग्स आणि दारूच्या वाट्याला कधीच गेले नाही. मी अन्यायाविरोधात आवाज उठवणारी महिला आहे. मात्र, मी लेसबियन नाही. राखी सावंतने बोलल्यामुळे मी तशी होत नाही. माझ्यासोबत झालेला अन्याय मी सगळ्या जगासमोर आणला आहे. #Metoo प्रकरणी मी घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक महिलांना मदतच होणार आहे. दरम्यान, तनुश्रीच्या या वक्तव्याला आता राखी सावंत काय आणि कसं उत्तर देते? यामुळे कोणता नवा वाद निर्माण होतो? आणि एकंदरच #Metoo मोहिमेला कोणतं नवं वळण प्राप्त होतं या सगळ्याची उत्तरं येणारी वेळ देईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -