घरताज्या घडामोडीKisan Rail: मध्य रेल्वेची १००० वी किसान रेल्वे धावली, रेल्वे मंत्र्यांनी...

Kisan Rail: मध्य रेल्वेची १००० वी किसान रेल्वे धावली, रेल्वे मंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

Subscribe

आतापर्यंत ३.४५ लाख शेतमालाची वाहतूक १०००व्या किसान रेल्वेमध्ये मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मोदी सरकारने सुरू केलेला किसान रेल (Kisan Rail)  हा उपक्रम एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे.  आज ३ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेवर १००० वी किसान रेल्वे धावली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Minister of Railways Ashwini Vaishnaw)  यांनी १०००व्या किसान रेलला हिरवा झेंडा दाखवला.   किसान रेलच्या माध्यमातून आतापर्यंत ३.४५ लाख शेतमालाची वाहतूक  करण्यात आली आहे. सावदा, महाराष्ट्र ते आदर्श नगर दिल्ली या ट्रेनला २३ डबे होते ज्यात ४५३ टन केळीची वाहतूक करण्यात आली होती.

या मेळाव्याला संबोधित करताना माननीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, आपला देश कृषीप्रधान आहे आणि माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. किसान रेलच्या माध्यमातून चांगली किंमत मिळण्यासाठी फळे आणि भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूंची वाजवी दरात दूरच्या बाजारपेठेत वाहतूक ही अशीच एक योजना असल्याचे त्यांनी सांगितले. तोमर म्हणाले की, मध्य रेल्वेवरील किसान रेल्वेच्या १०००व्या फेरीला हिरवा झेंडा दाखविण्याच्या या प्रसंगी उपस्थित राहून मला खूप आनंद होत आहे कारण पहिल्या किसान रेल आणि १००व्या किसान रेलला पंतप्रधान यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्याच्या प्रसंगी ते उपस्थित होते.

- Advertisement -

अश्विनी वैष्णव, माननीय रेल्वे मंत्री म्हणाले की माननीय पंतप्रधान नेहमी शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवतात आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध पावले उचलतात. किसान रेल हा असाच एक उपक्रम आहे ज्याने शेतकर्‍यांना त्यांचे कृषी उत्पादन आर्थिकदृष्ट्या आणि त्वरीत दूरच्या बाजारपेठेत पोहोचवले जाते. जीआय टॅग मिळालेल्या जळगावच्या केळीचाही त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. त्यांनी जळगावच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करून पुढील सुधारणा करण्यासाठी काही सूचना असल्यास पुढे याव्यात असे आवाहन केले.

रावसाहेब दादाराव पाटील दानवे, माननीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार आणि खासदार रक्षा खडसे यांनीही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी रेल्वेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.

- Advertisement -

यावेळी सावदा रेल्वे स्थानकावर माननीय आमदार द्वय चंद्रकांत पाटील आणि शिरीष चौधरी उपस्थित होते.  व्ही.के. त्रिपाठी, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे बोर्ड यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि किसान रेल सुरू झाल्यापासून छोट्या शेतकऱ्यांमध्ये ती कशी लोकप्रिय होत आहे याबद्दल माहिती दिली. अनिलकुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी आभार मानले.


हेही वाचा – Mega Block: मध्य रेल्वेवर ‘या’ दिवशी ७२ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, ४३७ गाड्या रद्द, पाहा संपूर्ण वेळापत्रक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -