‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री मृणाल दुसानीसने (Mrunal Dusanis) आपल्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. दीर्घकाळापासून टेलिव्हिजनसृष्टीतून गायब असणाऱ्या मृणालच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. या छोट्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती तिने तिच्या सोशल मिडिया पोस्टमधून दिली आहे. मृणालने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये लहान बाळाचे कपडे,शूज आणि एक टेडी बिअर ठेवलेला दिसत आहे. हा फोटो अगदी बोलका असून, या बेबी क्लोथवर ‘Coming Soon’ असं लिहिलं आहे. या फोटोसह तिने ‘आम्ही ठरवलं आहे की, यापुढे झोपायचे नाही,स्वत:साठी वेळ हवा आहे किंवा यापुढे आम्हाला स्वच्छ घरातच राहायचे आहे. आमचा आनंदी क्षण लवकरच येणार आहे’, अशा आशयाचे कॅप्शन मृणालने लिहिले आहे.
View this post on Instagram
२५ फेब्रुवारी २०१६ ला मृणाल दुसानीस आणि नीरज मोरे दोघेही लग्नबंधनात अडकले.अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या नीरजसोबत अरेंज मॅरेज केले. नीरज अमेरिकेतच राहात असून मृणाल देखील सध्या तिथेच राहत आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानीसने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर तिने ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत काम केले होते. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ मालिका अर्ध्यात सोडून तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि आता बऱ्याच काळानंतर चाहत्यांसाठी गुड न्यूज दिली.
हे ही वाचा – Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकरांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली, व्हेंटिलेटरवर हलवले