घरताज्या घडामोडीLata Mangeshkar: लतादीदींच्या निधनानंतर ए.आर.रहमान झाला भावूक; म्हणाला...

Lata Mangeshkar: लतादीदींच्या निधनानंतर ए.आर.रहमान झाला भावूक; म्हणाला…

Subscribe

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या २८ दिवसांपासून लतादीदींवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी त्यांचं निधन झालं. लतादीदींच्या निधनामुळे राष्ट्रीय दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. लतादीदींच्या जाण्यामुळे त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी झाली आहे. आज सांयकाळी साडे सहा वाजता शासकीय इतमामात लतादीदींवर अंत्यसंस्कार शिवाजी पार्क येथे होणार आहेत. पाच पिढ्यांना आपल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांच्याशिवाय बोलताना संगीतकार ए.आर.रहमानने काही जुन्या आठवणी सांगत त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. इन्स्टाग्रामवर ए.आर.रहमानने आपला व्हिडिओ आणि लतादीदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

ए.आर.रहमान म्हणाला की, ‘लतादीदींसोबत माझे पहिले गाणे ‘जिया जले’ होते. त्यांच्याजवळ असणे हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे होते. माझ्या वडिलांकडे एक तरुण वयातला लता मंगेशकर यांचा फोटो होता. हा फोटो ते रोज सकाळी उठून संगीताच्या प्रेरणेसाठी पाहत होते. कोणत्याही प्रकारच्या गायनात त्या शिखर होत्या. लतादीदींसारखे गाणारे ना कोणी झाले आणि ना कोणी होणार. आता आम्हा लोकांना काय-काय करावे लागत नाही. ड्रेस बदला, मेकअप करा, म्युझिक व्हिडिओ शूट करा, स्टेजवर उड्या मारा, नाचा. परंतु त्यांनी यापैकी काय केले, काहीच नाही. फक्त संगीताचा सराव केला. संपूर्ण आयुष्य संगीताला अर्पण केले. त्या जगातील संगीताची प्रेरणा मानल्या जातात. दरम्यान लता मंगेशकर यांच्यासोबत काम करून मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by ARR (@arrahman)

- Advertisement -

लतादीदींच्या जाण्याने देशभरात शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.


हेही वाचा – Lata Mangeshkar: …म्हणून लतादीदींनी लग्न नाही केले


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -