घरताज्या घडामोडीIndia China Border: भारत आणि चीनमधील सीमा वादात रशिया मध्यस्थी करणार की...

India China Border: भारत आणि चीनमधील सीमा वादात रशिया मध्यस्थी करणार की नाही?

Subscribe

भारतमधील रशियाचे नवे राजदूत डेनिस एलिपोव म्हणाले की, ‘लडाख मुद्द्यावर रशियाची भारत आणि चीनमध्ये मध्यस्थी करण्याची कोणतीही योजना नाही. जर दोन्ही देशांनी मध्यस्थीची इच्छा व्यक्त केली तर रशिया यावर विचार करेल.’

रशियाची सरकारी वृत्तसंस्था स्पुटनिकसोबत बोलताना एलिपोव म्हणाले की, ‘भारत आणि चीनमध्ये मध्यस्थी करण्यासाठी आमची कोणती योजना नाही. परंतु जर मध्यस्थी करण्याची इच्छा दोन्ही पक्षांची व्यक्त केली, तर निश्चित रुपात आम्ही यावर सर्वात जास्त सावधगिरीने विचार करू. दोन्ही पक्ष आपापसातील प्रादेशिक विवाद पूर्णपणे द्विपक्षीय दृष्टीने पाहतात, त्यामुळे मध्यस्थीचा काही अर्थ नाही. आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला आशा आहे की दोन्ही बाजू लवकरात लवकर राजनैतिक मार्गाने हा प्रश्न सोडवतील.’

- Advertisement -

भारत आणि चीनमधील पूर्व लडाख क्षेत्रात लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर जवळपास दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत १४ चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. परंतु आतापर्यंत यामधून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. चर्चेनंतर अनेक मुद्द्यांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. १४ चर्चेच्या फेऱ्यादरम्यान दोन्ही पक्षांनी लवकरात लवकर कमांडर स्तरावरील बैठक घेण्यासाठी सहमती दर्शवली होती.


हेही वाचा – Lakhimpur Kheri Case: केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला जामीन मंजूर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -