घरताज्या घडामोडीनाटक सिनेमासाठी 50 टक्क्यांची मर्यादा, मात्र मुंबई मनपा निवडणुकीसाठी TRP चा तमाशा...

नाटक सिनेमासाठी 50 टक्क्यांची मर्यादा, मात्र मुंबई मनपा निवडणुकीसाठी TRP चा तमाशा सुरु – केदार शिंदे

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच अनेक गोष्टींवरील निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यातच आता हॉटेल्स,मॉल्स किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये माणसांची गर्दी ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त दिसत असल्यामुळे आता कलाकारही नाट्यगृह आणि सिनेमागृहांवरील 50 टक्क्यांचं बंधन काढून टाकावं अशी मागणी करत आहेत.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले आहे. या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अनेक व्यवसायांवर निर्बंध लादण्यात आले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच अनेक गोष्टींवरील निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यातच आता हॉटेल्स,मॉल्स किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये माणसांची गर्दी ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त दिसत असल्यामुळे आता कलाकारही नाट्यगृह आणि सिनेमागृहांवरील 50 टक्क्यांचं बंधन काढून टाकावं अशी मागणी करत आहेत. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांचे ट्वीट्स सोशलमिडियावर कायमच चर्चेत असतात. दरम्यान, केदार शिंदे यांनी नाट्यगृह आणि सिनेमागृहातील 50 टक्के आसनक्षमतेच्या बंधनाबाबत एक ट्वीट केलं आहे.

- Advertisement -

या ट्वीट्मध्ये केदार शिंदे यांनी, ‘आमच्या नाटक सिनेमाला 50 टक्के बंधनं. रोज राजकिय नाटक रस्त्यावर सुरू आहेत त्यांना काहीच नियम नाहीत? फक्त मुंबई मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रस्त्यावर उतरणे आणि तमाशा करून TRP मधे राहाणे एवढच काम करतायत, असा टोला केदार शिंदे यांनी लगावला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीची थेट मुख्यमंत्र्यांना विनंती

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

- Advertisement -

या मागणीवर काल रविवारी 13 फेब्रुवारीला अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत विनंती केली. यामध्ये ती असं म्हणाली की, ‘पावनखिंड’ हा सिनेमा रिलीजच्या वाटेवर असून,सरकारने चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने सुरु करावी, अशी राज्य सरकारने कळकळीची विनंती केली आहे. ‘लहान तोंडी मोठा घास,पण आता बोलायला हवे’, अशा आशयाचे कॅप्शन प्राजाक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे.

मनसे चित्रपट सेनेची मागणी 

इतकं सर्व सुरळीत चालू असताना, मला असं वाटतं राज्य सरकारने कोरोनाचा कौतुक सोहळा बंद करुन नाट्यगृह आणि चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने सुरु करावी ही मनसे चित्रपट सेनेची मागणी असल्याचे अमेय खोपकर यांनी सांगितले.


हे ही वाचा – Madhubala Birth Anniversary: नऊ वर्ष अंथरुणाला खिळून होती मधुबाला, नाका तोंडातून व्हायचा रक्तस्त्राव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -