घरमनोरंजनValentine’s Day निमित्त अमृता फडणवीसांकडून नव्या गाण्याची घोषणा; म्हणाल्या, 'संगीतमय कौतुक करणार...

Valentine’s Day निमित्त अमृता फडणवीसांकडून नव्या गाण्याची घोषणा; म्हणाल्या, ‘संगीतमय कौतुक करणार आहे माझ्या रुद्रचं’

Subscribe

2021 च्या व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानेही अमृता फडणवीस यांनी आपलं नवं गाणं चाहत्यांच्या भेटीस आणलं होतं.

राजकीय विषयांवरील वक्तव्ये आणि आपल्या हटके गाण्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त एक विशेष ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी चाहत्यांसाठी नवीन खुशखबर आणली आहे.या ट्विट व्हॅलेंटाईन्स डेचा उल्लेख असला तरी यातून आगामी गाण्याची घोषणा केली आहे.

अमृता फडणवीस यांनी आपलं नवीन गाणं येण्याची घोषणा करण्याबरोबरचं स्वत:चा एक फोटोही पोस्ट केला आहे. अमृता फडणवीस या फोटोमध्ये भगवान शिवशंकराच्या अवतारात दिसत आहेत. अमृता यांनी चेहऱ्यासमोर त्रिशूळ पकडला आहे. त्यामुळे त्यांचे आगामी गाणे भगवान शंकरावर आधारित असल्याचे म्हटले जातेय.

- Advertisement -

अमृता यांनी फोटो पोस्ट करत लिहिले की, मी तुझी निवड आता आणि कायमस्वरूपी केली आहे. तू माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात आणि श्वासात आहेत. व्हॅलेंटाइन डेनिमित्त आपल्या प्रिय लोकांबद्दल आपले प्रेम व्यक्त करायचे असते त्या दिवशी मी माझ्या रुद्राला एक संगीतमय स्तुती अर्पण करतेय,” अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी #valentine #lordshiva असे हॅशटॅगही वापरले आहेत. मात्र फोटो आणि कॅप्शनवरुन त्यांचे आगामी गाणं भगवान शंकरावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

- Advertisement -

2021 च्या व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानेही अमृता फडणवीस यांनी आपलं नवं गाणं चाहत्यांच्या भेटीस आणलं होतं. ‘ये नैना डरे डरे’ असं शीर्षक असणारे ते एक प्रेमगीत होते. रोमॅन्टिक असलेल्या या गाण्यात त्या स्वत:च स्वत;च्या व्हॅलेंटाईन असल्याप्रमाणे आनंद घेत होत्या.


RBI Recruitment 2022 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास 950 रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -