घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपाणीपुरवठा योजनांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

पाणीपुरवठा योजनांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

Subscribe

महसूलमंत्री थोरात यांनी केला होता पाठपुरावा

संगमनेर : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील नऊ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी 11 कोटी 99 लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते अजय फटांगरे व कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना फटांगरे म्हणाले, कोरोनाच्या संकटानंतर नामदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध विकासकामांसाठी महाराष्ट्र सरकारमधून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला आहे. याचबरोबर जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विविध जिल्हा परिषद सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे 11 कोटी 99 लाख 17 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

- Advertisement -

या अंतर्गत तळेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य महेंद्र गोडगे यांच्या पाठपुराव्यातून तळेगाव पाणी पुरवठा योजनेसाठी 1 कोटी 92 लाख 45 हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. तर बोटा गटातील कुरकुंडी पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 43 लाख 35 हजार, म्हसवंडी पाणी पुरवठा योजनेसाठी 1 कोटी 1 लाख 73 हजार रुपये, भोजदरी पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 38 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

तसेच साकूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य व महिला बालकल्याण विभागाच्या सभापती मीरा शेटे यांच्या पाठपुराव्यातून जांबूत बु. पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 39 लाख 65 हजार रुपये तर पिंपळगाव देपा पाणी पुरवठा योजनेसाठी 92 लाख 44 हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. निमोण गटाचे जि. प. सदस्य भाऊसाहेब कुटे यांच्या पाठपुराव्यातून पारेगाव खुर्द पाणीपुरवठा योजनेसाठी 87 लाख 71 हजार रुपये तर जोर्वे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शांताबाई खैरे यांच्या पाठपुराव्याने वाघापूर योजनेसाठी 1 कोटी 3 लाख 85 हजार रुपये व पिंपरणे योजनेसाठी 1 कोटी 99 लाख 24 हजार निधी मंजूर झाला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -