घरठाणेकोपरी बारा बंगला परिसरात रस्ता खचला

कोपरी बारा बंगला परिसरात रस्ता खचला

Subscribe

रस्त्यावरील वाहतूक बंद

कोपरी बारा बंगला येथील मुख्य वनरक्षक कार्यालय येथे भूमिगत मलनिःसारण व पाण्याच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरु असताना तेथील रस्त्याचा काही भाग खचल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास समोर आली. तर या रस्त्यावरील वाहतुक पुढील दोन दिवस मलनिस्सारण आणि पाण्याच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम होईपर्यंत पुर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती आपत्ती विभागाचे अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

कोपरी पूर्व येथे भूमिगत मलनिःस्सारण आणि पाण्याच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरु होते. त्यावेळी अचानक तेथील रस्त्याचा काही भाग खचल्याचे निर्दशनास आले. याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यस्थापन, कोपरी वाहतूक पोलीस कर्मचारी, ठामपा मलनिःस्सारण आणि पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी धाव घेत तातडीने त्या रस्त्यावरील वाहतुक बंद केली. यामध्ये कोणालाही दुखापत झाले नसून त्या रस्त्या वाहतूक शाखेच्या परवानगीने पुढील दोन दिवस मलनिःसारण व पाण्याच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम होईपर्यंत वाहतुकीकरीता पुर्णपणे बंद केला असून तेथील मलनिःसारण व पाण्याच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सावंत यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -