घरमनोरंजनऋषी कपूर यांचा 'Sharmaji Namkeen' हा अखेरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस; 'या' दिवशी...

ऋषी कपूर यांचा ‘Sharmaji Namkeen’ हा अखेरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ दिवशी होणार रिलीज

Subscribe

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमधून एक लखलखता तारा निखळला आहे. देशसह जगभरात ऋषी कपूर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे चित्रपट त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे ऋषी कपूर यांचा कोणताही चित्रपट चाहत्यांसाठी एक आनंदाचे क्षण असतो. आता लवकरचं ऋषी कपूर यांच्या शेवटच्या अभिनयाची चुनूक प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कारण त्यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

- Advertisement -

ऋषी कपूर यांनी या चित्रपटाचे काही भागांचे शूटिंग पूर्ण केले होते. पण त्यांच्या निधनानंतर चित्रपटाच्या राहिलेल्या भागाचे शूटिंग परेल रावल यांनी पूर्ण केले. त्यामुळे चित्रपटात परेश रावल आणि ऋफी कपूर हे दोन्ही कलाकार एकाच भूमिकेत पडद्यावर झळकरणार आहेत. 31 मार्च रोजी हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर रिलीज होईल.

कौटुंबिक जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश भाटिया यांनी केलेय, तर रितेश सिडवाणी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत मॅकगफिन पिक्चर्सचे हनी त्रेहान व अभिषेक चौबे यांच्या सहाय्याने निर्मिती केली आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि परेश रावल तसेच जुही चावला, सुहेल नायर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चढ्ढा आणि ईशा तलवार हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. शर्माजी नमकीन हा पहिला हिंदी सिनेमा आहे.

- Advertisement -

स्व- शोधाच्या हृदयस्पर्शी कहाणीवर आधारित असलेल्या शर्माजी नमकीन सिनेमात नुकत्याच निवृत्त झालेल्या गृहस्थाला स्वयंपाकाची आपल्याला असलेली आवड काही बिनधास्त स्त्रियांच्या भिशीत सहभागी झाल्यावर लक्षात येते. अशा एकूण कथेभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते.


बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्री करतात अभिनयासह चित्रपटांची निर्मिती


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -