घरठाणेठाण्यात कोरोनामुळे क्षयरोगाचे रुग्ण ५० टक्क्यांवर

ठाण्यात कोरोनामुळे क्षयरोगाचे रुग्ण ५० टक्क्यांवर

Subscribe

एकिकडे कोरोनाचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रमाणात वाढला होता की त्याचा परिणाम इतर आजारांच्या रुग्ण संख्येवर दिसून आल्याने रुग्ण संख्येतही घट होऊ लागली आहे.

एकिकडे कोरोनाचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रमाणात वाढला होता की त्याचा परिणाम इतर आजारांच्या रुग्ण संख्येवर दिसून आल्याने रुग्ण संख्येतही घट होऊ लागली आहे. त्यातच कोरोना आणि क्षयरोग (टी.बी) यासारख्या संसर्गजन्य आजाराचे लक्षणे जवळपास सारखी असल्याने बऱ्याच रुग्णांवर कोरोना कालावधीत कोरोनाचे उपचार केले गेल्याने क्षयरोगाच्या चाचण्यांची संख्या कमी झाले. त्यामुळेच क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत प्रचंड घट झाल्याचे दिसून आले आहे. ही रुग्ण जवळपास ५० टक्क्यांनी घटली आहे. मात्र, दीड वर्षात या आजाराने ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते ३१ या वयोगटातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ) यंदाच्या जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेऊन त्याचा मुळापासून उच्चाटन करण्याचा संकल्प ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर ठामपाच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोफत चाचण्या आणि औषधोपचार करण्यात येतात.गेल्या काही वर्षांपासून ठामपा हद्दीत दरवर्षी आठ ते साडे आठ हजारांच्या आसपास क्षयरोग रुग्ण मिळून येत होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जसा वाढला आणि त्यातच दोन्ही आजारांची लक्षणे एक सारखीच असल्याने क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत मोठी घट होता दिसून आले. कोरोना कालावधीत म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून शहरात वर्षभरात अवघे साडेचार हजारांच्या आसपास रुग्ण पुढे आले आहेत. त्यामुळे ही संख्या ५० टक्क्यांनी कमी झाले असेच दिसत आहे. दुसरीकडे सापडलेल्या रुग्ण संख्येपैकी १५३४ रुग्णांनी तिसरा आणि चौथा टप्पा ओलांडला असून ते सद्यस्थितीत औषधांना प्रतिसाद देत नसल्याने त्यांना बीडीक्यु नावाचे औषध सुरू करण्यात आले आहे. ही गोळी असून त्या औषधाचा खर्च हा दहा लाख इतका आहे. तो संपुर्ण खर्च महापालिका केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून केला जात आहे.अशी माहिती आरोग्य सूत्रांनी दिली.

- Advertisement -

” या रुग्णांच्या खासगी लॅबमध्ये चाचण्याही विनामुल्य करण्यात येतात. त्याचेही पैसे केंद्र आणि राज्य शासन देते. रोग प्रतिकार शक्ती कमी असणे, सहव्याधी, वयोवृद्ध, शस्त्रक्रीया झालेले रुग्ण, चुकीचा आहार, व्यवस्थित झोप न घेणे, यामुळे क्षयरोगाची लागण होऊ शकते, मात्र ही लक्षणे जाणवल्यानंतर नागरिकांनी योग्य निदान करून घ्यावे. तसेच वेळेवर औषधोपचार केल्यास रुग्ण बरा ही होतो. नागरिकांनी उगाच घाबरून जाऊ नये,”
– डाॅ. प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी, ठामपा

दीड वर्षात ६८ जणांचा क्षयरोगाने मृत्यू
ठामपामध्ये आढळून आलेल्या ४५०० रुग्णांपैकी ६८ जणांचा दीड वर्षात मृत्यू झाला. ११५ जणांवर औषधोपचार सुरू आहे. तर २६ इतर राज्यातील असून ३० जणांनी उपचार घेणे बंद केले आहे. विशेष ९६० जणांनी वेळेत औषधोपचार घेतल्याने ते आता बरेही झालेले आहेत. मात्र १ हजार ५३४ यांची प्रकृती चिंताजनक आहे.

- Advertisement -

वयोगटानुसार रुग्ण आकडेवारी
वयोगट रुग्ण संख्या
१५ ते ३१ १४३०
३१ ते ४५ ५३७
४६ ते ६० २६७
६० पुढील ०८६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -