घरपालघरकार्यादेशविना घाईघाईने रस्त्याची सुधारणा काम उरकण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न

कार्यादेशविना घाईघाईने रस्त्याची सुधारणा काम उरकण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न

Subscribe

मार्चअखेर आधी बिले पदरात पडावी म्हणून ठेकेदार काम घाई-घाईत उरकून घेण्याचा प्रकार करत असल्याची बाब उजेडात आली आहे.

पालघर तालुक्यातील धनसार पोल्ट्रीफार्म ते नवोदय विद्यालय रस्त्याची सुधारणा करणे या कामासाठी कार्यादेश (वर्कऑर्डर) मिळालेला नाही. असे असताना मार्चअखेर आधी बिले पदरात पडावी म्हणून ठेकेदार काम घाई-घाईत उरकून घेण्याचा प्रकार करत असल्याची बाब उजेडात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांनेच वर्क ऑर्डर नसल्याची कबुली देऊन बेकायदा कामाला मदतच केली जात असल्याचे दाखवून दिले आहे. या रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र, कामाचे कार्यादेश अद्याप देण्यात आलेला नाही. असे असताना ठेकेदाराने मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण करून बिल काढून घेण्यासाठी कार्यादेश नसतानाही काम सुरु केले आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करून याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वर्कऑर्डर नाही म्हणून फलक लावता येत नाही. वर्कऑर्डरवर असलेली माहितीच फलकवर लिहिली जाते. वर्कऑर्डर आल्यानंतर फलक लावला जाईल.
– आशीष संखे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

- Advertisement -

याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता धात्रक तसेच शाखा अभियंता आशीष संखे यांच्याकडे वर्कऑर्डरची मागणी केली असता धात्रक व संखे यांनी आधी उडवा-उडवीची उत्तरे दिली. नंतर पुन्हा विचारले असता आशीष संखे यांनी कबूल केले की, धात्रक यांना माहिती नसेल, पण या कामाची वर्कऑर्डरच नाही. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांचा ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. कामाबाबत सविस्तर माहिती नागरिकांना समजू नये म्हणून या कामावर जाणीवपूर्वक फलक लावले गेले नाही. रस्त्याचे कुठल्याही काम सुरू असताना संबंधित रस्त्याची माहितीचे फलक जिल्हाधिकाऱ्यांनी अनिवार्य केले असूनही ठेकेदाराकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. वर्षानुवर्षे या रस्त्यावर कामे मंजूर होतात. पण त्या कामांचा दर्जा नसल्याने अशी कामे एका पावसातच वाहून जातात. त्यामुळे याप्रकराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा –

दिशा सालियान प्रकरणात नारायण राणेंना दिलासा, दिंडोशी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -