घरताज्या घडामोडीHoli 2022: धुळवड खेळताना जर तोंडात, डोळ्यात आणि कानात रंग गेला तर...

Holi 2022: धुळवड खेळताना जर तोंडात, डोळ्यात आणि कानात रंग गेला तर काय करायचे? वाचा

Subscribe

आज धूलिवंदन आहे. संपूर्ण देशभरात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या दिवशी एकमेकांना रंग लावून धूलिवंदन साजरी करतात. धूलिवंदन साजरा करताना भान नसते, त्यामुळे रंग चुकून तोंडात, डोळ्यात आणि कानात जातो. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. कारण बाजारात मिळणाऱ्या रंगांमध्ये केमिकल्स आणि इतर शरीरासाठी हानिकारक असणारे घटक असतात. त्यामुळे धूलिवंदन खेळताना रंगाचा वापर सावध होऊ केला पाहिजे.

जर धूलिवंदन खेळताना काही गोष्टी लक्षात घेतल्या तर तोंडात, डोळ्यात आणि कानात रंग जाण्यापासून बचाव होऊ शकतो. पण जर होळी दरम्यान तोंडात, डोळ्यात आणि कानात रंग गेला तर काही फर्स्ट अँड टिप्स वापरून यामुळे निर्माण होणार समस्या रोखू शकतात.

- Advertisement -

रंगापासून कानाचे संरक्षण कसे करायचे?

कान हे नेहमी खुलेच असतात. त्यामुळे धूलिवंदनाच्या दिवशी कानात सहज रंग जातो. त्यामुळे जेव्हा कानात रंग जाईल तेव्हा डोकं खाली करून चारीबाजूला झटका जेणेकरून कानातला रंग बाहेर पडेल. तसेच कानातला रंग काढण्यासाठी ईअरबड्सचा वापर करू शकता. याशिवाय कानात चांगले तेलाचे काही थेंब घातले तरी स्थिती खूप सुधारते.

तोंडात रंग गेला तर काय करायचे?

जेव्हा तोंडात रंग जाईल तेव्हा स्वच्छ पाण्याने गुळण्या करा. जोपर्यंत तोंडातला संपूर्ण रंग बाहेर जात नाही तोपर्यंत स्वच्छ पाण्याने गुळण्या करत राहा. पाणी जर थोडे गरम असेल तर खूप चांगले. तोंडात रंग गेला असेल तर कमीत कमी एक तास काही खाऊ-पिऊ नये. गुळण्या केल्यानंतर माऊथवॉशने तोंड साफ करा.

- Advertisement -

रंगाच्या वाईट परिणामापासून डोळे ठेवा सुरक्षित

धूलिवंदन खेळताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी सनल्गासेजचा वापर केला पाहिजे. जर तुम्ही कॉन्टॅक्ट लॅंसचा वापर करता तर ते काढले पाहिजे. तसेच रंगाने भरलेले हात सतत डोळ्यांना लावू नका. तरीही डोळ्यात रंग गेला तर नॉर्मल पाणी शिंपटून डोळे धुवा. रंगामुळे डोळे जळजळतात. त्यामुळे ते स्वच्छ सूती कपड्याने साफ करा. डोळ्यातील रंग काढण्यासाठी गुलाबपाणी देखील तितकेच फायदेशीर आहे.


हेही वाचा – Holi 2022 : केस, चेहरा आणि नखांवरील रंग निघत नसल्यास ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -