घरदेश-विदेशRussia Ukraine War : खारकीवजवळ रशियाच्या हवाई हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू, आंतरराष्ट्रीय...

Russia Ukraine War : खारकीवजवळ रशियाच्या हवाई हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाला हरताळ

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 23 दिवसांपासून घमासान युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांत युद्ध थांबवण्यासाठी अनेक बैठक झाल्या मात्र हे युद्ध थांबवण्याच नाव घेत नाही. युक्रेन शरण येण्यास तयार नसल्याने रशियाने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरावर आत्तापर्यंत हल्ले केले. अशात काल रशियन सैन्याने युक्रेनच्या खारकीवजवळही हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात जवळपास 21 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. खारकीवजवळील शाळा आणि सांस्कृतिक केंद्रावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे रशियाने युद्ध थांबवण्याच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासत हल्ले सुरुच ठेवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनच्या मारियुपोल शहरातील थिएटरवर हवाई हल्ला केला. यावेळी या थिएटरमध्ये 1000 लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात 21 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

- Advertisement -

रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय फेटाळला

रशियाने युक्रेनवर हल्ले सुरु ठेवत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा युद्ध थांबवण्याचा आदेश फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी एक आदेश जारी करत युक्रेनवरील हल्ले थांबवण्यास सांगितले होते.

रशियाच्या हल्ल्यात अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू

रशियाच्या हवाई हल्ल्यात युक्रेनमधील अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू झाला आहे. ओक्साना या कीव्ह शहरात राहत होत्या. त्या राहत असलेल्या इमारतीवर रशियाने मिसाईल हल्ला केला, या हल्ल्यात ओक्साना यांचा मृत्यू झाला, 67 वर्षांच्या ओक्साना या यंग थिएटर ग्रुपच्या भाग होत्या. युक्रेनच्या सर्वोच्च कलात्मक सन्मानांपैकी एका सन्मानानं त्यांना गौरवण्यात आले आहे.


Dhulivandan : देशभरात धुलिवंदनाचा उत्साह शिगेला, पंतप्रधानांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -