घरठाणेकोरोनामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील बालकांना कायदेविषयक सहाय्यासाठी २३ मार्च रोजी लोकअदालत

कोरोनामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील बालकांना कायदेविषयक सहाय्यासाठी २३ मार्च रोजी लोकअदालत

Subscribe

जिल्ह्यातील ४४ बालकांना त्यांचा वारसा हक्क मिळवून देणे, वडिलोपार्जीत घर, शेती त्यांच्या नावावर करून देणे आदी बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना कायदेविषयक सहाय्यासाठी येत्या २३ मार्च रोजी लोकअदालत घेण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी सांगितले. जिल्हा कृती दल आणि जिल्हा विधी व न्याय सेवा प्राधीकरणाच्या माध्यमातून या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील ४४ बालकांना त्यांचा वारसा हक्क मिळवून देणे, वडिलोपार्जीत घर, शेती त्यांच्या नावावर करून देणे आदी बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांची संख्या ठाणे जिल्ह्यात ४४ असून केंद्र व राज्य शासनामार्फत त्यांच्या शिक्षणाची आणि भवितव्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून या बालकांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisement -

या बालकांना कायदेविषयक बाबींविषयी मागर्दर्शन करण्यात यावे याबाबत जिल्हा कृती दलाच्या बैठकीत जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी निर्देश दिले होते. जिल्हा कृती गटाचे सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गायकवाड यांनी जिल्हा सत्र मुख्य न्यायाधीश मंत्री आणि जिल्हा विधी व न्याय सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. मंगेश देशपांडे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार २३ मार्च रोजी लोक अदालत घेण्यात येणार आहे.

या ४४ बालकांचा सांभाळ करणारे त्यांचे पालक, त्यांना समुपदेशन करणारे शासकीय समुपदेशक, जिल्हा तालुका संरक्षण अधिकारी यांना देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ठाणे बाल कल्याण समिती यांना कायदेशीर पालक घोषीत करण्यासाठी निमंत्रीत करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -