घरमहाराष्ट्रभारतमातेची मोदींकडे पाठ; राज ठाकरे यांच नवं कार्टून

भारतमातेची मोदींकडे पाठ; राज ठाकरे यांच नवं कार्टून

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिपावलीच्या निमित्ताने भाऊबीजेच्या दिवशी मोदी सरकारवर आणखी एक मार्मिक भाष्य करणारं व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केल आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिपावलीच्या निमित्ताने रोज एक नवं कार्टून लोकांसमोर आणण्याचे म्हटले होते. त्यानुसार आज, ९ नोव्हेंबर म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी त्यांनी मोदी सरकारवर आणखी एक मार्मिक भाष्य करणारं व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केल आहे. यामध्ये नरेंद्र मोदी भारतमाता आपल्याला ओवाळेल या आशेने पाटावर बसले आहेत. मात्र भारतमातेने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. ती म्हणतेय, गेल्या वेलेस ओवाळले पण आता यापुढे नाही ओवाळणार. शिवाय व्यंगचित्रात २०१४ निवडणूकीत मोदींनी दिलेली आश्वासनं आणि २०१८ सालची देशाची परिस्थिती यांच्या पाट्या भारतमाता पाहताना दिसत आहे. त्यामुळे याचा २०१९ च्या निवडणूकीत भारतातील जनता पुन्हा मोदींना निवडून देणार नाही, असाच अर्थ होतो.

- Advertisement -

वाचा : ‘ओवाळणी दिलीत तर याद राखा’; राज ठाकरेंचा टोला

वाचा : राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांना ‘धुतले’

- Advertisement -

दिवाळीची खास भेट 

राज ठाकरे ६ ते ९ नोव्हेंबर याकाळात आपल्या व्यंगचित्रांमधून अशाचप्रकारे सत्ताधाऱ्यांचा समाचार घेणार आहेत. धनोत्रयदशीपासूनच या दिवाळी विशेष व्यंगचित्रांच्या मालिकेची त्यांनी सुरुवात केली होती. दिवाळीच्या त्या-त्या दिवसांचं महत्व आणि निमित्त साधत राज ठाकरेंनी ही व्यंगचित्र साकारली. ज्याद्वारे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा सर्व बड्या आणि सत्ताधारी नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -