घरक्रीडाIPL 2022: दीपक चहरला पुन्हा दुखापत; चेन्नईच्या संघासमोर मोठं संकट

IPL 2022: दीपक चहरला पुन्हा दुखापत; चेन्नईच्या संघासमोर मोठं संकट

Subscribe

चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू अष्टपैलू दीपक चहर हा संपूर्ण आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता चेन्नई या संकटातून मार्ग कसा काढते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल)च्या पंधराव्या पर्वात चेन्नईनं अद्याप विजयाचा नारळ फोडलेला नाही. त्यातच यंदाच्या पर्वासाठी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी यानं चेन्नईचं कर्णधारपद सोडलं. त्यानतर फिरकीपटू रविंद्र जाडेजाकडे चेन्नईचे कर्णधारपद सोपवण्यात आलं. परंतु, रविंद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सध्या पराभवाची मालिका सुरू आहे. त्यामुळं मोठं संकट सध्या चेन्नई समोर उभं आहे. अशातच आता आणखी संकटाचा सामना चेन्नईच्या संघाला करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच कारण म्हणजे चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू अष्टपैलू दीपक चहर हा संपूर्ण आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता चेन्नई या संकटातून मार्ग कसा काढते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू अष्टपैलू दीपक चहर हा संपूर्ण आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता आहे. हंगामातील चार सामने खेळून झाल्यावरही अद्याप चेन्नईला एकही विजय मिळवता आलेला नाही. दीपक चहरशिवाय संघाच्या वेगवान गोलंदाजीत हवा तो प्रभाव दिसत नाही. अशा स्थितीत दीपक चहरचे तंदुरूस्त नसणे हा चेन्नईसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)

- Advertisement -

बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅब ट्रीटमेंट घेत असताना दीपक चहरच्या पाठीला दुखापत झाल्याचं समजतं. त्यामुळं दीपक चहरचे आयपीएलमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता अधिक संशयास्पद आहे. दुखापती किती गंभीर स्वरूपाची आहे, याबाबत चेन्नई सुपर किंग्सला ‘बीसीसीआय’कडून अद्याप औपचारिक अहवाल मिळालेला नाही. दीपक चहर गेल्या महिन्याभरापासून NCA मध्ये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)

फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या भारताच्या टी-२० मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. एनसीए फिजिओच्या प्राथमिक अंदाजानुसार, दीपक चहर आयपीएलमधील पहिल्या टप्प्याला मुकेल, असे बोललं जात होते. तो तंदुरूस्त झाल्यास एप्रिलच्या उत्तरार्धात पुनरागमनासाठी चेन्नईचा संघ आशावादी होता. पण आता नव्यानं झालेल्या दुखापतीमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022 : “लपून क्रिकेट खेळायचो…”; RCB च्या आकाशदीपनं सांगितला आयपीएलपर्यंतचा प्रवास

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -