घरक्राइमरोलेटकिंग कैलास शहाला लागणार मोक्का

रोलेटकिंग कैलास शहाला लागणार मोक्का

Subscribe

ज्यांची फसवणूक झाली, ज्यांनी आपले पैसे मालमत्ता गमावली अश्या तरुणांनी पोलिस ठाण्यात तक्रार करावी असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आवाहन

नाशिक : रोलेटकिंग कैलास जोगेंद्रप्रसाद शहा (वय ३२) याला पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी जिल्हा न्यायालयात जामीन रद्दसाठी अपील दाखल केले आहे. कैलास शहा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात १२ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे १३ गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक पाटील यांनी त्याच्यावर मोक्का कारवाईसाठी पोलीस महासंचालकांना मोक्का कारवाईचा प्रस्ताव दिला आहे.

कैलास शहा याचे नाशिक शहर व जिल्ह्यात रोलेटचे नेटवर्क आहे. तो एजंटांमार्फत तरुणांना बळजबरीने रोलेट खेळण्यास लावत असून, त्यातून लाखो रुपये तरुणांकडून दमदाटी, धमकी, शिवीगाळ व मारहाण करुन घेतले आहेत. त्याच्या दहशतीमुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केली आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी त्यांच्यावर मोक्का कारवाई केली आहे. कैलास शहाविरुद्ध नाशिक तालुका, पिंपळगाव, गंगापूर, भद्रकाली, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, ओझर, दिंडोरी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने पिंपळगाव शहरात रोलेटच्या नावाखाली वावी ठुशी (ता. निफाड) येथील तक्रारदार रामराव बबन रसाळ यांची ४५ लाख ४४ हजार ३१५ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शहाविरुद्ध पिंपळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला २० एप्रिल २०२२ रोजी नाशिकमधून सापळा रचून अटक केली. जामीन अर्जावर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

- Advertisement -

कैलास शहाविरोधातील आर्थिक गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे. तरुणाई रोलेटच्या आहारी जावू नये व रोलेटचे पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी शहाविरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव दिला आहे. पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने शहाला जामीन दिला असला तरी रद्दसाठी अपील केले आहे. : सचिन पाटील, पोलीस अधीक्षक

 

- Advertisement -

पोलीस अधीक्षकांचे आवाहन

रोलेट बळजबरीने तरुणाईला खेळण्यास सांगत लाखो रुपयांना गंडा घातला जात आहे. रोलेटमुळे तरुणांसह विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, अनेकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काही तरुण रोलेट जिंकण्याच्या आमिषाने कर्जबाजारी झाले आहेत. ज्या तरुणांची रोलेटमुळे फसवणूक झाली, ज्यांनी त्यासाठी मालमत्ता विकल्या अशा तरुणांनी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -