घरताज्या घडामोडीलग्नाआधी महिला पोलिसाकडून होणाऱ्या नवऱ्याला अटक, काय आहे प्रकरण?

लग्नाआधी महिला पोलिसाकडून होणाऱ्या नवऱ्याला अटक, काय आहे प्रकरण?

Subscribe

आसामच्या महिला उपनिरीक्षकाने लग्नाआधीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. बनावट ओळखपत्र तयार करून लग्न करण्याचा तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा प्रयत्न होता, असा आरोप करण्यात येत आहे. तसेच त्याने इतर लोकांची देखील फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर उपनिरीक्षकाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी आरोपीला नागाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे प्रकरण आसाममधील नागाव जिल्ह्यातील आहे. नगाव पोलीस ठाण्याच्या महिला कक्षाच्या प्रभारी उपनिरीक्षक जोनमणी राभा यांनी तिचा नवरा राणा पगला बनावट ओळखपत्र देऊन लग्न करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि लाखो रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

जानेवारी २०२१ मध्ये दोघांची भेट

जॉनमनी राभा यांनी सांगितले की, जानेवारी २०२१ मध्ये माजुली येथे पोस्टिंग करत असताना तिची पगशी भेट झाली. यादरम्यान पगने स्वत:ची ओळख ओएनजीसीचे जनसंपर्क अधिकारी अशी करून दिली. भेटीनंतर काही दिवसांनी पगने जोनमणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. जो त्याने स्वीकारला होता. यानंतर जॉनमनी आणि पग या दोघांच्या कुटुंबियांची भेट झाली आणि दोघांची ऑक्टोबर २०२१ मध्ये एंगेजमेंट झाली आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याचे लग्न करण्याचे निश्चित झाले होते.

सुरूवातीला जॉनमनी यांनी पगच्या कार्यशैलीबद्दल शंका घेण्यास सुरूवात केली. कारण जॉनमनी स्वत: जनसंपर्क आणि जाहिरातींमध्ये पदवी प्राप्त केली होती. मंगळवारी तिघांना भेटल्यानंतर तिच्या संशयाचे रूपांतर विश्वासात झाले. या तिघांनी जॉनमनीला सांगितले की, पगने कंत्राट देण्याच्या नावाखाली २५ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर जॉनमनीला पग ओएनजीसीसोबत काम न करण्याचे समजले.

- Advertisement -

हेही वाचा : दोन लसींना ९ महिने पूर्ण होण्याआधीच घेता येणार लसीचा बुस्टर डोस; NTAGI ची शिफारस


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -