दोन लसींना ९ महिने पूर्ण होण्याआधीच घेता येणार लसीचा बुस्टर डोस; NTAGI ची शिफारस

ntagi recommends covid 19 precaution dose before 9 months for those flying abroad
विदेशात प्रवास करणारे प्रवासी 9 महिन्यांच्या अंतरापूर्वीच बुस्टर डोस घेण्यास NTAGI ची शिफारस

परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लसीकरणास एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होऊ शकतो. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीच्या कोरोना कार्यकारी समितीने नऊ महिन्यांच्या आधीच लसीचा बुस्टर डोस घेण्यास परवानगी देण्याची शिफारस केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एंटागी यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून ही शिफारस केली. मात्र प्रत्येकासाठी बूस्टर डोस गॅप कमी करण्यासाठी कोणतीही शिफारस केलेली नाही.

भारतात बूस्टर डोस गॅप कमी करायचा की नाही यावर तज्ज्ञांची संमिश्र मते आहेत. दरम्यान 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी सरकारची परवानगी असूनही, फारच कमी लोकांनी खबरदारी म्हणून तिसरा डोस घेण्यास स्वारस्य दाखवले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या कोरोना नॅशनल टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक लसीकरण आणि कोरोना संसर्गाविरूद्धचा तिसरा डोस यांच्यातील अंतर जितके जास्त असेल तितकी व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली असेल. त्यांच्या एका निवेदनात ते म्हणाले की, लाभार्थींना दिलेला दुसरा डोस अगदी अलीकडे दिला, आणि आता तिसरा डोस दिल्यास त्याचा काहीच परिणाम होणार नाही.
कारण ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यांची प्रतिकारशक्ती आधीपासूनचं मजबूत असेल.

दरम्यान 10 एप्रिल 2022 पासून खाजगी लसीकरण केंद्रांद्वारे 18 वर्षांवरील लोकसंख्येसाठी बुस्टर डोस सुरू करण्यात आला. त्यामुळे, ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक आहे आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिने पूर्ण झाले आहेत, ते सर्व बुस्टर डोससाठी पात्र असतील. भारताने या वर्षी 10 जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, हेल्थकेअर वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्रतिबंधात्मक डोस देणे सुरू केले.