घरताज्या घडामोडी...पण १४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

…पण १४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

Subscribe

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पालिकेने सर्वांसाठी पाणी नवे धोरण जाहीर केलं आहे. या प्रकल्पाद्वारे मुंबईकरांना रोज समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून २०० दशलक्ष लीटर गोडे पाणी मिळणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी अर्थसंकल्पातून अनेक विशेष तरतुदींची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी एक म्हणजे, सर्वांसाठी पाणी हे एक आहे. दरम्यान, १४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.

…तसा मास्क मी १४ तारखेला काढणार आहे

गेल्या काही दिवसांपासून माणसात आल्यासारख वाटत आहे. मी माईक समोर मास्क काढला आहे. तसा मास्क मी १४ तारखेला काढणार आहे, कारण हा महापालिकेचा कार्यक्रम आहे. मी पाणी गढूळ करु पाहत नाही. पाणी देण्याच्या कार्यक्रमात मला राजकारण आणायचं नाही. प्रत्येकाला याचे भान असले पाहिजे, कुठे काय बोलायचे याचे ज्ञान असले पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

- Advertisement -

मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला सांगायच्या आहेत

सभेला सुरुवात झाली असून मी १४ तारखेला सभा घेणार आहे. पण चौदा तारखेची सभा म्हणजे उटसूट आणि इकडे वार तिकडे वार असं करणार नाही. जे काही माझ्या मनामध्ये आहे. ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाहीये. पण मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील उत्तर दिलं होतं.

माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या नेत्यांमधले एक नेते

माझा जन्म मुंबईचा असल्यामुळे मी मुंबईकर आहेच. मुंबईत जन्मलेला हा व्यक्ती राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मला नक्कीच अभिमान आहे. जो मी विचार करत होतो, तो मी हाच विचार करत होतो की, कालच्या १ मे ला संयुक्त महाराष्ट्रला ६२ वर्ष पूर्ण झाली. ६२ वर्षापूर्वी माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या नेत्यांमधले एक नेते होते. गेल्या काही काळातली बदलती मुंबई हे आम्ही सगळं बघत बघत मोठे झालो आहोत. तेव्हाची मुंबई कशी होती. आताची आणि उद्याची कशी असणार हा एक मोठा प्रश्न आहे.

- Advertisement -

कौतुकाची थाप मारणारे खूप कमी…

मुंबईची रचना ही बऱ्याचश्या ठिकाणामध्ये समुद्र सपाटी पासून खाली आहे. त्यामुळे कितीही काही केलं तरी मोठी भरती आल्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचतं. त्यासाठी आपण अनेक मार्ग काढत आहोत. परंतु हे नळातलं पाणी दाखवत नाही. हे तुंबलेलं पाणी दाखवतंय. त्यासाठी आम्ही काम करत आहोत. हिंदमाता तुंबणार नाही, यासाठी आपण अटोकाट प्रयत्न करत आहोत. तसेच काही किलोमीटरपर्यंत आपण जलबोगदे केले आहेत. अशा प्रकारे मुंबई महापालिका काम करतेय त्यामुळे कोणीतरी आपुलकीची थाप तरी द्यायला पाहीजे. कारण बाकीचे थापा मारणारे खूप आहेत. पण कौतुकाची थाप मारणारे खूप कमी आहेत.

हल्ली थापा मारण्याची फार सवय आहे. अच्छे दिन येतील असं म्हटले होते, पण आता वाट बघतोय, अशा थापा चालणार नाहीत. अशी थापेबाजी आपल्याला परवडणार नाही. ही थापेबाजी एक-दोन वेळा चालेल. पण सतत लोकं ही थापेबाजी सहन करू शकत नाहीत आणि लोकांनी सहन करता कामा नये, असं मुख्यमंत्री म्हणाले.


हेही वाचा : पुण्यात वसंत मोरेंची महाआरती, राज ठाकरे पुण्यात दाखल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -