घरताज्या घडामोडी'असानी'चे चक्री वादळात रूपांतर, या तीन राज्यांना सतर्कतेचा इशारा

‘असानी’चे चक्री वादळात रूपांतर, या तीन राज्यांना सतर्कतेचा इशारा

Subscribe

बंगालच्या उपसागरात रविवारी संध्याकाळी असानी चक्रीवादळाचं रुपांतर तीव्र चक्री वादळात झालं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, असनी उत्तर आंध्र-ओडिशा किनारपट्टीवरून पश्चिम-मध्य आणि लगतच्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचल्यानंतर मंगळवारी उत्तर-पूर्वेकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंगालच्या उपसागरात रविवारी संध्याकाळी असानी चक्रीवादळाचं रुपांतर तीव्र चक्री वादळात झालं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, असनी उत्तर आंध्र-ओडिशा किनारपट्टीवरून पश्चिम-मध्य आणि लगतच्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचल्यानंतर मंगळवारी उत्तर-पूर्वेकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी पश्चिम बंगाल, ओडिशा किनारपट्टीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

असनीमुळे पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या तीन राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी असानी चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची आणि गुरुवारपर्यंत खोल दाबामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 11 मे रोजी असनी चक्रीवादळ आपला मार्ग बदलत भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या समांतर पुढे सरकणार आहे. तर 12 मे रोजी चक्रीवादळ कमकुवत होत डीप डीप्रेशनमध्ये परावर्तित होईल.

- Advertisement -

10 मे आणि 11 मे रोजी आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला समांतर सरकेल आणि मंगळवारी संध्याकाळपासून पाऊस पडेल. दरम्यान सतर्कतेचा इशारा दिल्याने राज्य सरकारने बचाव कार्यासाठी पुरेशी व्यवस्था केली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, ओडिशा आपत्ती जलद प्रतिसाद दल आणि अग्निशमन सेवांचे बचाव पथक सज्ज आहेत. बालासोरमध्ये एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली असून ओडीआरएएफची एक टीम गंजम जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे.

पुरी जिल्ह्यातील कृष्णा प्रसाद, सातपारा, पुरी आणि अस्तरंग ब्लॉक आणि केंद्रपारा मधील जगतसिंगपूर, महाकालपाडा आणि राजनगर आणि भद्रक येथेही ओडीआरएएफची टीम तयार आहेत. दरम्यान, मंगळवारी ओडिशातील गजपती, गंजम आणि पुरीच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -