घरमहाराष्ट्रदहावीचा निकाल 20 जूनपर्यंत, तर बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत लागणार

दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत, तर बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत लागणार

Subscribe

कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली आहे. ऑफलाईन परीक्षा देण्यास सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती, परंतु मंडळाकडून उत्तमरीत्या नियोजन करण्यात आल्याने परीक्षा सुरळीत पार पडल्या.

शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना लागलेली असतानाच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण होत आले असून निकाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल २० जूनपर्यंत, तर बारावीचा निकाल १० जूनपर्यंत लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी दिली.

कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली आहे. ऑफलाईन परीक्षा देण्यास सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती, परंतु मंडळाकडून उत्तमरीत्या नियोजन करण्यात आल्याने परीक्षा सुरळीत पार पडल्या. नियमित वेळापत्रकानुसार अखेरच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो. म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागत असतात, परंतु यंदा बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरू झाला. त्यातच शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्यामुळे विद्यार्थ्यांचे पेपर तसेच पडून होते. त्यामुळे निकाल उशिरा लागण्याची शक्यता होती. तरीही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करू, असे आश्वासन शिक्षण मंडळाने दिले होते. मंडळाने आश्वासन दिल्यानुसार 10 दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

- Advertisement -

यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी, तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली, तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरू झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या. राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -