घरलाईफस्टाईलसावधान ! बॉडी बिल्डिंगसाठी तुम्ही घेत असलेल्या प्रोटीन पावडरमध्ये आहेत 'हे' १३०...

सावधान ! बॉडी बिल्डिंगसाठी तुम्ही घेत असलेल्या प्रोटीन पावडरमध्ये आहेत ‘हे’ १३० विषारी केमिकल्स

Subscribe

सध्या अनेकजण बॉडी फिट ठेवण्यासाठी प्रोटीन सप्लीमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या प्रोटीन सप्लीमेंटला साध्या भाषेत प्रोटीन पावडर सुद्धा म्हणतात. या प्रोटीन सप्लीमेंटचा वापर प्रोफेशनल बॉडीबिल्डरपासून ते फिटनेस क्षेत्रात नवीन असलेल्यांपर्यंत सगळेचजण एक्सरसाइज नंतर करतात. मात्र काही रिसर्चनुसार प्रोटीन पाउडरचे पिण्याचे फायदे असतातच शिवाय याचे अनेक नुकसान सुद्धा असतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, एका अभ्यासात १३४ प्रोटीन पाउडर मध्ये १३० प्रकारचे खतरनाक केमिकल उपलब्ध असतात.

प्रोटीन पावडर म्हणजे काय?
प्रोटीन पावडर सप्लीमेंट, पाउडरच्या रूपात असते. तसेच प्रोटीन पावडर अनेक प्रकारचे असते. जसे की कैसीन, व्हे प्रोटीन इ. प्रोटीन पावडरमध्ये साखर, आर्टिफिशिअल स्वीटनर, मिनरल मिक्स केलेले असतात. बाजरात मिळणाऱ्या प्रोटीन पावडरमधील एका चमचामध्ये १० ते ३० ग्राम प्रोटीन असतात.

- Advertisement -

प्रोटीन पावडर घेण्याचे नुकसान

  • हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, जर कोणी प्रोटीन पावडरचा उपयोग करत असेल तर त्याला त्याचे नुकसान होऊ शकते. प्रोटीन पावडरमुळे डाइजेशन संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच पोटाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.
  • काही प्रोटीन पावडरमध्ये कमी प्रमाणात साखर आढळते किंवा जास्त प्रमाणात आढळते. ही जास्त प्रमाणातील साखर शरीरासाठी घातक ठरू शकते. या प्रोटीनमुळे जास्त ब्लड शुगर लेवल वाढते.
  • हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, २०२० मध्ये क्लीन लेबल प्रोजेक्ट नावाच्या एका नॉन प्रॉफिट ग्रुपने प्रोटीन पावडरमध्ये विषारी केमिकलयुक्त पदार्थ असल्याचा रिपोर्ट दिला होता. त्या रिपोर्टनुसार १३४ प्रोटीन पावडर प्रोडक्टची तपासणी केल्यावर असं आढळून आलं की त्यामध्ये १३० प्रकारचे विषारी पदार्थ होते.
  • या रिपोर्टनुसार बऱ्याच प्रोटीन पावडरमध्ये जास्त प्रमाणात धातू, बिस्फेनॉल-ए, कीटनाशक आणि इतर विषारी पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळतात. या विषारी केमिकलमुळे कॅंन्सर सारखे खतरनाक आजार होऊ शकतात.

प्रोटीन पावडरचे सेवन करावे का?
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते नेहमी केमिकल फ्री प्रोटीन पावडरचा उपयोग करावा. परंतु या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही सप्लीमेंटचा वापर करू नये.

- Advertisement -

तुम्हाला जर प्रोटीन पावडरचा वापर करायचा नसेल तर , तुम्ही त्या व्यतिरिक्त फळं, दूध, दही, पनीर, अंडी, चिकन, मासे या पदार्थांचे सेवन करा.

 

 


हेही वाचा :Health Tips : तुम्ही सुद्धा उभं राहून पाणी पिता का? आजच व्हा सावधान नाहीतर होतील ‘हे’ आजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -