घरपालघर'मग्रारोहयो'तून यंदा ६०० हेक्टर क्षेत्रावर होणार फळबाग लागवड

‘मग्रारोहयो’तून यंदा ६०० हेक्टर क्षेत्रावर होणार फळबाग लागवड

Subscribe

जव्हार तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मग्रारोहयो) तून ६०० हेक्टर क्षेत्रावर  फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीची कामे झाल्यावर देखील काम मिळावे. यासाठी यंदा जव्हार तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मग्रारोहयो) तून ६०० हेक्टर क्षेत्रावर  फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळावे, याद्वारे फळबाग लागवड होऊन शास्वत विकास व्हावा, यासाठी मग्रारोहयोतून फळबाग योजना राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी ३९५.०० हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्यात आली. तर यंदा ६०० हेक्टरचे लक्षांक देण्यात आले आहे.

गेल्यावर्षी ३९५.०० हेक्टर तर या वर्षी ६००.०० हेक्टर लक्षांक आहे. फळबाग अंदाजपत्रक मंजुरीचे कार्यवाही काम सुरू आहे.
– वसंत नागरे, तालुका कृषी अधिकारी, जव्हार

- Advertisement -

तालुक्यात मग्रारोहयोतून आंबा, कागदी लिंबू, पेरु, सीताफळ, आवळा, साग, फणस, निशिगंध, बांबू, शेवगा ही रोपे लावण्यात येणार असून प्रत्येक रोपाबाबत हेक्टरी क्षेत्र ठरविण्याचे अंदाजपत्रक तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे बनविण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी पिकांचे नुकसान होत आहे. अतिवृष्टी, अवकाळी शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याजात आहे. यातून शेतकरी सावरावा, त्याच्या हाताला काम मिळावे, कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावा, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून  फळबाग लागवड करण्यात येत आहे.

मग्रारोहयोतून मिळणारी रोजंदारी

प्रतिदिवस २५६ रुपये मजुरी ही रोजगार हमी योजनेतंर्गत देण्यात येत होती. परंतु आता मजुरीच्या दरात फक्त आठ रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे यंदा २४८ रुपयांऐवजी २५६ प्रतिदिन रुपये मजुरी देण्यात येत आहे. २८ मार्च २०२२ रोजी ग्रामीण विकास मंत्रालयाने अधिसूचना जारी केली होती. सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर कमालीचे वधारले असताना रोहयोच्या मजुरीचे दरात मात्र अल्पशी वाढ करण्यात आल्याने मजूर वर्गात नाराजी आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

कुत्रा भुंकतोय, भुंकू दे; अकबरुद्दीन ओवेसींची राज ठाकरेंवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -