घरताज्या घडामोडीCORBEVAX च्या आपत्कालीन वापराला DCGI कडून परवानगी, फक्त बुस्टर डोस घेता येणार

CORBEVAX च्या आपत्कालीन वापराला DCGI कडून परवानगी, फक्त बुस्टर डोस घेता येणार

Subscribe

हैदराबाद येथील बायोलॉजिकल इंडिया लिमिटेड कंपनीने (Biological India Limited) CORBEVAX नावाची लस तयार केली आहे. या लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

देशात ९० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस (Corona Vaccine)घेतले आहेत. आता बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने बुस्टर डोसची (Booster Dose) मागणी वाढली आहे. यातच, हैदराबाद येथील बायोलॉजिकल इंडिया लिमिटेड कंपनीने (Biological India Limited) CORBEVAX नावाची लस तयार केली आहे. या लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (Drug Controller General Of India) आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली असली तरी याचा वापर बुस्टर डोससाठी करण्यात येणार आहे. Covaxin किंवा Covishield चे दोन्ही डोस घेतलेले नागरिक आपत्कालीन काळात CORBEVAX चा बुस्टर डोस घेऊ शकतील.

- Advertisement -

हेही वाचा नाशिक जिल्ह्यात 100 टक्के कोरोना लसीकरण

दुसरा डोस घेऊन ९० दिवस पूर्ण केलेल्या नागरिकांना बुस्टर डोस (Booster Dose) घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या कोरोनाचा (Corona) संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्याने बुस्टर डोस गरजेचे बनले आहे. त्यातच, CORBEVAX लसीला मान्यता मिळाल्याने लसीकरणाला हातभार लागणार आहे. मात्र, या लसीचा (Vaccine) वापर आत्पकालीन काळातच करण्यात येणार आहे.

- Advertisement -

बायोलॉजिकल ई-लिमिटेडच्या प्रबंधक निर्देशक महिमा दतला यांनी सांगितलं की, डीसीजीआयच्या या निर्णयामुळे आम्ही खूश आहोत. यामुळे भारतात बुस्टर डोसची कमतरता भासणार नाही. टेक्सास चिल्ड्रन हॉस्पिटल आणि बायलर कॉलेज ऑफ मेडिसिनच्या सहाय्याने ही लस तयार करण्यात आली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -