Varanasi Serial Blast Case: गाझियाबाद न्यायालयाने वलीउल्लाहला ठरवले दोषी; 6 जूनला होणार शिक्षेची सुनावणी

varanasi serial blast case ghaziabad court convicted waliullah sentenced to be sentenced on 6 june
Varanasi Serial Blast Case: गाझियाबाद न्यायालयाने वलीउल्लाहला ठरवले दोषी; 6 जूनला होणार शिक्षेची सुनावली

गाझियाबादच्या जिल्हा सत्र न्यायलयाने 16 वर्षे जुन्या वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज आरोपी वल्लीउल्लाला दोषी ठरवले आहे. बॉम्बस्फोट मालिकेतील दोन प्रकरणांमध्ये जिल्हा न्यायाधिशांनी दहशतवादी वल्लीउल्लाला दोषी ठरवले आहे. तर एका प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. (varanasi serial blast case)

या प्रकरणातील आरोपी वल्लीउल्लाह याला शनिवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दुपारी 3.30 वाजता जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांनी बनारसमधील संकट मोचन मंदिरात झालेल्या स्फोटात वल्लीउल्लाला दोषी ठरवले. याठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. (ghaziabad court)

तर दशाश्वमेध घाटावर कुकुर बॉम्ब सापडल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी वल्लीउल्लाला दोषी ठरवले. मात्र हा या बॉम्बचा स्फोट होण्याआधीच तो शोधण्यात आला. तिसरी घटना रेल्वे कॅन्ट बॉम्बस्फोटाची होती. या स्फोटात सहा जण ठार झाले होते. मात्र पुराव्यांअभावी वल्लीउल्लाला या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. (varanasi ghaziabad news)

दोषी ठरवलेल्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयात 6 जून रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. वाराणसी बॉम्ब स्फोट प्रकरणी सुनावणी 23 मे रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयात पूर्ण झाली. या शिक्षेवर निकाल देण्यासाठी न्यायालयाने 4 जून ही तारीख निश्चित केली होती.

काय प्रकरण आहे

7 मार्च 2006 रोजी वाराणसीतील संकटमोचन मंदिर आणि कॅन्ट रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट झाले होते. याशिवाय दशाश्वमेध घाटावरही कुकर बॉम्ब सापडला आहे. या बॉम्बस्फोटात अनेक जण ठार झाले, तर डझनभर लोकं जखमी झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण गाझियाबाद येथे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आले. फिर्यादीच्या वतीने जीआरपी कँट स्फोटात ५३, संकट मोचन स्फोटात ५२ आणि दशाश्वमेध घाट प्रकरणात ४२ साक्षीदार हजर झाले.

या सिरियल बॉम्बस्फोटांच्या संदर्भात, उत्तर प्रदेश पोलिसांनी 5 एप्रिल 2006 रोजी प्रयागराज जिल्ह्यातील फुलपूर गावातील रहिवासी असलेल्या वलीउल्लाला अटक केली. मात्र सबळ पुराव्यांसह, पोलिसांनी दावा केला की, संकट मोचन मंदिर आणि कॅन्ट रेल्वे स्टेशन, वाराणसी येथे स्फोट घडवण्याच्या कटामागे वलीउल्लाचा हात होता. पोलिसांनी वलीउल्लाहचे दहशतवादी संघटनेशी संबंधही सांगितले होते.


तुमचं Aadhaar Card नकली तर नाही? ‘या’ स्टेप्स फॉलो करत एका मिनिटात चेक करा