घरCORONA UPDATECorona PM Modi : कोरोनावर पंतप्रधान मोदींचा मंत्र; लसीकरण मोठे संरक्षण कवच,...

Corona PM Modi : कोरोनावर पंतप्रधान मोदींचा मंत्र; लसीकरण मोठे संरक्षण कवच, मुलांच्या लसीकरणास प्राधान्य

Subscribe

देशात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह 10 राज्ये अशी आहेत जिथे धोक्याची चिन्हे आहेत. याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाविरोधी लसीकरण आणि सुरक्षेसंदर्भात चर्चा केली. सर्व राज्यांचे मत ऐकून घेतल्यानंतर पीएम मोदींनी राज्यांना संबोधित केले आणि कोरोना संदर्भात पुढे काय रणनीती अवलंबली पाहिजे हे सांगितले. यावेळी मोदींनी कोरोनावर काही कानमंत्र दिले आहेत. लसीकरण मोठे संरक्षण कवल, मास्क वापरणे गरजेचे असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे.

पीएम मोदी म्हणाले की, “कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. ओमिक्रॉन आणि त्याचे सब व्हेरिएंट कसे गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात, हे आपण युरोपमधील देशांमध्ये पाहू शकतो. गेल्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये कोरोना केसेस वाढत आहेत. पण भारतात परिस्थती नियंत्रणात आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या वाढत असल्याने अलर्ट राहणे गरजेचे आहे. मागील कोरोना लाटेने आम्हाला खूप काही शिकवले, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा यशस्वीपणे सामना केला.”

- Advertisement -

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये सर्व आवश्यक उपकरणांची उपस्थिती सुनिश्चित केली पाहिजे. काही कमतरता असेल तर ती वरच्या स्तरावर दूर करण्याची गरज आहे. आम्ही कोरोनाविरुद्ध लढत राहू आणि मार्गही शोधत राहू. कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही आणि लस ही त्याच्याशी लढण्यासाठी सर्वात मोठी ढाल आहे, असं देखील मोदींनी स्पष्ट केले.

“आपल्या देशात बऱ्याच काळानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कुटुंबीयांची चिंता वाढत आहे. काही शाळांमधून मुलांना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. अधिकाधिक बालकांना लसीचे कवच मिळत आहे, ही समाधानाची बाब आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

- Advertisement -

आपल्या प्रौढ लोकसंख्येपैकी 96 टक्के नागरिकांना कोरोना लसीच्या पहिल्या डोस तर 15 वर्षांवरील वयाच्या पात्र लोकसंख्येपैकी 85 टक्के लोकांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे, ही प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे, इतर देशांच्या तुलनेत कोविड संकट चांगल्या प्रकारे हाताळूनही आपल्या काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आपल्याला सतर्क राहावं लागेल. कोविडचं संकट अद्याप टळलेलं नाही, असं कोविड-19 परिस्थितीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले.

बालकांचे लसीकरण करणे हे आमचे प्राधान्य

“मुलांच्या लसीकरणावर बोलताना पीएम मोदी म्हणाले की, सर्व पात्र बालकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. याबाबत शिक्षक आणि पालकांनी जागरुक राहावे, याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. तिसऱ्या लाटेदरम्यान, आम्ही दररोज 3 लाखांहून अधिक प्रकरणे पाहिली. आपल्या सर्व राज्यांनी त्यांना हाताळले आणि इतर सर्व सामाजिक, आर्थिक क्रियाकलापांना चालना दिली. आमचे शास्त्रज्ञ आणि तज्ञ राष्ट्रीय आणि जागतिक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या सूचनांवर आपण पूर्वाभिमुख, सक्रिय आणि सामूहिक दृष्टिकोन ठेवून काम केले पाहिजे. सुरुवातीच्या काळात संसर्ग थांबवणे हे आमचे प्राधान्य होते, ते आजही तसेच राहिले पाहिजे. असे आवाहन मोदींनी सर्व राज्यांना केले आहे.

पीएम म्हणाले, “मार्चमध्ये आम्ही 12-14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले. 6-12 वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही परवानगी देण्यात आली आहे. सर्व पात्र बालकांना लवकरात लवकर लसीकरण करणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनासंदर्भात आमची २४ वी बैठक आहे. कोरोनाच्या काळात केंद्र आणि राज्यांनी ज्या प्रकारे एकत्र काम केले, त्यामुळे देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे देखील मोदींनी नमूद केले.

 


Myanmar : नोबेल विजेत्या आंग सान सू की यांना पाच वर्षांचा तुरुंगवास; भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी सुनावली शिक्षा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -