घरमहाराष्ट्रसंशोधन प्रकल्प अहवालात हेराफेरी ; विद्यापीठाने पाठवल्या ४०० प्राध्यापकांना नोटीसा

संशोधन प्रकल्प अहवालात हेराफेरी ; विद्यापीठाने पाठवल्या ४०० प्राध्यापकांना नोटीसा

Subscribe

यूजीसीकडून प्राध्यापकांना संशोधनासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी वितरीत केला गेला. परंतु,संशोधन प्रकल्प अहवालात (रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट) मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे आढळून आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेल्या ४ वर्षांत प्राध्यापकांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्प अहवालात (रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट) मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून ४०० प्राध्यापकांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) प्राध्यापकांनी संशोधनासाठी रिसर्च प्रोजेक्ट स्किम राबविण्यात आली. त्यासाठी यूजीसीकडून प्राध्यापकांना संशोधनासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी वितरीत केला गेला. प्राध्यापकांनी दिलेल्या प्रस्तावानुसार त्यांना निधी मंजूर करण्यात आला. मात्र योजनेअंतर्गत संशोधन करून विद्यापीठाला सादर केलेल्या संशोधन प्रकल्प अहवालामध्ये मोठ्या प्रमाणात इतर संशोधकांच्या संशोधनातील कॉपी पेस्ट माहिती असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा – पुणे विद्यापीठाचा प्रथम क्रमांक

- Advertisement -

असा झाला खुलासा

प्राध्यापकांनी गेल्या ४ वर्षांत यूजीसीचा निधी घेऊन शेकडो संशोधन अहवाल सादर केले. या संशोधन अहवालांची छाननी केली असता या गंभीर बाबी उजेडात आल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे संशोधनातील चोरी शोधण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे त्याचा उलगडा झाला आहे. त्यामुळे ४०० प्राध्यापकांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.


हेही वाचा – राज्यातील सर्व विद्यापीठांमधील हिंदी भाषेसाठीची शिष्यवृत्ती बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -