घरट्रेंडिंगअग्निवीरांसाठी आनंद महिंद्रांची मोठी घोषणा, महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरीची ऑफर

अग्निवीरांसाठी आनंद महिंद्रांची मोठी घोषणा, महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरीची ऑफर

Subscribe

लष्कर, वायुसेना आणि नौदलात भरतीच्या नवीन अग्निपथ योजनेंतर्गत सुरुवातीला तरुणांना चार वर्षांसाठी ठेवले जाईल

भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच अग्निपथ ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत फक्त चार वर्षांसाठी तरुणांना सैन्यात सेवा बजावता येणार आहे. मात्र या योजनेला आता देशभरातून विरोध होत आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान जाळफोळ आणि अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या. आता देशातील प्रसिद्ध उद्योजक आणि महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सैन्यात भरतीच्या नव्या अग्निपथ योजनेला होत असलेल्या विरोधाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या योजनेअंतर्गत प्रशिक्षित तरुणांना नोकऱ्या देण्याची मोठी घोषणा केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ही घोषणा अशा वेळी केली आहे जेव्हा सरकार आणि विविध मंत्रालयांनी अग्निपथ योजनेला देशभरात विरोध होत असताना सर्व सवलती जाहीर केल्या आहेत. दरम्यान या योजनेच्या निषेधार्थ सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

- Advertisement -


आनंद महिंद्रा यांनी सोमवारी सकाळी ट्विट करत लिहिले की, अग्निपथ योजनेला सुरू असलेल्या विरोधामुळे मी दु:खी आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेची कल्पना सुचली तेव्हा मी सांगितले होते आणि आता पुन्हा पुन्हा सांगतो की, या योजनेअंतर्गत शिस्त आणि कौशल्य असलेले अग्निवीर तयार होती. त्यामुळे त्याला उत्तम रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांच्या भरतीचे स्वागत करतो.

आनंद महिंद्रा यांच्या या घोषणेचे ट्विटरवर सर्वांनी स्वागत केले. एका यूजरने प्रश्न विचारला की महिंद्रा ग्रुपमध्ये अग्निवीरांना कोणते पद दिले जाईल? याला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले की, कॉर्पोरेट क्षेत्रात अग्निवीरांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. नेतृत्व, सांघिक कार्य आणि शारीरिक प्रशिक्षण यामुळे उद्योगाला अग्निवीरच्या रूपाने बाजारपेठेनुसार तयार व्यावसायिक मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऑपरेशन्सपासून प्रशासन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनापर्यंत संपूर्ण बाजारपेठ त्यांच्यासाठी खुली असेल.

- Advertisement -

लष्कर, वायुसेना आणि नौदलात भरतीच्या नवीन अग्निपथ योजनेंतर्गत सुरुवातीला तरुणांना चार वर्षांसाठी ठेवले जाईल. प्रशिक्षणानंतर त्यांना तैनाती मिळेल. चार वर्षांनंतर 25 टक्के अग्निवीरांना सैन्यात भरती केले जाईल. या योजनेचे विरोधक असा युक्तिवाद करत आहेत की, यामुळे बेरोजगारी आणखी वाढेल आणि त्यांचे करियर अनिश्चित होईल. मात्र, सरकार याचा साफ नकार देत आहे.

संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्या आणि अग्निवीरांसाठी सशस्त्र दलात 10 टक्के आरक्षणासह अनेक सवलतीही सरकारने जाहीर केल्या आहेत. यूपी, एमपी, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक, आसाम, अरुणाचल यासारख्या अनेक राज्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे.


मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा..,अनिल बोंडेंचं सूचक ट्विट


 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -