घरताज्या घडामोडीमुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा..,अनिल बोंडेंचं सूचक ट्विट

मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा..,अनिल बोंडेंचं सूचक ट्विट

Subscribe

विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ९ वाजता सुरूवात झाली आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. यावेळी ११ उमेदवार रिंगणात असल्यामुळे कोणत्या पक्षाच्या उमेदवार जिंकणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे सर्वच पक्षांकूडन खबरदारी घेतली जात आहे. अशातच मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,अशा प्रकारचं सूचक ट्विट भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केलं आहे.

काळ आला होता भाऊ किंवा भाई वर, पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा, असं ट्वीट अनिल बोंडे यांनी केलं आहे. परंतु मिशीवाला मावळा कोण, अशा प्रश्न आता येथे उपस्थित होत आहे.

- Advertisement -

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज निवडणूक होत असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी नवनवीन योजना आखत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे, अशा प्रकारचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल दाखल झाले आहेत. तसेच मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेना आमदार देखील विधानभवनात दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत १५६ आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. मतदानाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून सायंकाळी या निवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : आत्तापर्यंत १५६ आमदारांचे मतदान पूर्ण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -