घरताज्या घडामोडीतलावांत गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ४६५ मिमी कमी पाऊस; मुंबईवर पाणी कपातीचे संकट

तलावांत गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ४६५ मिमी कमी पाऊस; मुंबईवर पाणी कपातीचे संकट

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या सात तलावांत गतवर्षी २० जूनपर्यंत सरासरी ५८१ मिमी प्रमाणे एकूण ४,०७० मिमी पाऊस (Rainfall) पडला होता. तर यंदा २० जूनपर्यंत सरासरी ११६ मिमी प्रमाणे फक्त ११६ मिमी इतकाच पाऊस पडला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या सात तलावांत गतवर्षी २० जूनपर्यंत सरासरी ५८१ मिमी प्रमाणे एकूण ४,०७० मिमी पाऊस (Rainfall) पडला होता. तर यंदा २० जूनपर्यंत सरासरी ११६ मिमी प्रमाणे फक्त ११६ मिमी इतकाच पाऊस पडला आहे. त्यामुळे तुलनात्मक भाग पाहिल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ४६५ मिमी कमी पाऊस पडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत १,४६,९७२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. (average rainfall in the lake is 465 mm less than last year Crisis of water cut in Mumbai)

मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या पाणीसाठ्याचे गणित केल्यास मुंबईला (Mumbai) पुढील ३८ दिवस पुरेल इतका म्हणजे २८ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे तलावांत समाधानकारक पाऊस पडून पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्यास मुंबईकरांवर जून अखेर पाणी कपातीचे (Water Shortage) संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यात ८४ टँकरव्दारे पाणीपुरवठा

मुंबईत ९ जूनपासून मान्सूनला (Monsoon) सुरुवात झाली. तेव्हापासून मुंबईत व पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव परिसरात तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठ्यात अपेक्षित वाढ न होता पाणी पातळी तळ गाठत आहे.

- Advertisement -

वास्तविक, या २० जूनपर्यंत सात तलावांपैकी एक उच्च वैतरणा तलावांत एकूण ४० मिमी, मोडक सागर – ९१ मिमी, तानसा – १०९ मिमी, मध्य वैतरणा – ६३ मिमी, भातसा – ८० मिमी, विहार – २०६ मिमी, तुळशी – २२६ मिमी असे एकूण सरासरी ११६ मिमी प्रमाणे एकूण ८१५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या सात तलावात १,४६,९७२ दशलक्ष लिटर (१०.१५ टक्के) इतका पाणीसाठा जमा आहे.

तर गतवर्षी २० जून २०२१ रोजीपर्यंत सात तलावांत जोरदार पाऊस पडला होता. त्यावेळी, उच्च वैतरणा तलावांत एकूण २७६ मिमी, मोडक सागर – ४४१ मिमी, तानसा – ४०७ मिमी, मध्य वैतरणा – ३०९ मिमी, भातसा – ३१५ मिमी, विहार – ९०८ मिमी, तुळशी – १,४१४ मिमी असे एकूण सरासरी ५८१ मिमी प्रमाणे एकूण ४,०७० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यावेळी सात तलावांत २,१३,९३७ दशलक्ष लिटर (१४.७८ टक्के) इतका म्हणजे ५५ दिवसांचा पाणीसाठा जमा होता.

२० जूनपर्यंत सात तलावातील तुलनात्मक पाऊस

तलाव            २० जून २०२२    २० जून २०२१
पाऊस मिमी        पाऊस मिमी

उच्च वैतरणा      ४०.००             २७६.००

मोडकसागर      ९१.००              ४४१.००

तानसा            १०९.००             ४०७.००

मध्य वैतरणा      ६३.००              ३०९.००

भातसा            ८०.००              ३१५.००

विहार             २०६.००            ९०८.००

तुळशी            २२६.००            १,४१४.००

एकूण पाऊस    ८१५.००             ४,०७०.००


हेही वाचा – मुंबईतील ‘या’ भागात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -