मुंबईतील ‘या’ भागात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक

राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. विशेष म्हणजे मुंबईत सर्वाधिक कोरोना (Coronavirus) रुग्ण आढळत असून, अंधेरी (Andheri) भागात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे.

coronavirus cases

राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. विशेष म्हणजे मुंबईत सर्वाधिक कोरोना (Coronavirus) रुग्ण आढळत असून, अंधेरी (Andheri) भागात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईमध्ये गेल्या आठवडाभरात अंधेरी पश्चिम (Andheri West) भागात १ हजार ४४१ रुग्ण, अंधेरी पूर्व भागात ९१५ रुग्ण आढळले आहेत. शहरातील २४ विभागांमधील सहा भाग वगळता अन्य भागांमध्ये दर आठवड्याला नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ५०० च्याही वर गेली आहे. (Corona Patients Increased In Andheri area Of Mumbai)

रुग्णवाढीच्या यादीमध्ये अंधेरीत सर्वाधिक रुग्ण असून त्याखाली चेंबूर, कुलाबा, वांद्रे भागामध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २८४ दिवसांपेक्षाही कमी झाला आहे. शहरात अंधेरीपाठोपाठ वांद्रे परिसरात करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ कायम आहे. वांद्रे परिसरात आठवडाभरात ९४५ रुग्ण नव्याने आढळले आहेत.

मुंबईत १३ हजार ६१३ रुग्ण उपचाराधीन

चेंबूर पश्चिम भागातील प्रादुर्भाव वेगाने वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्या मागील काही दिवसांमध्ये १०० च्या वर गेली आहे. मुंबईत १३ हजार ६१३ रुग्ण उपचाराधीन असून सर्वाधिक सुमारे १७ टक्के रुग्ण अंधेरीमध्ये आहेत. बहुतांश रुग्ण हे गृहनिर्माण संकुलांत आढळत आहेत. मात्र, झोपडपट्टीमध्ये रुग्णसंख्येची वाढ कमी आहे.

चाचण्या मात्र अजून कमीच

नागरिकांच्या सुरक्षेसाठी रुग्णवाढ वेगाने होणाऱ्या विभागांवर विशेष लक्ष देण्याचे सूचित केले आहे. याशिवाय, चाचण्या वाढविण्याचेही आदेश दिले असल्याचे समजते. चाचण्या मात्र अजून कमीच शहरातील दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत चढ-उतार सुरू असून सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावरही भर देण्यात आली आहे. कारण लसीकरणच कोरोनावरील जालीम उपाय मानला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे लसीकरणही मोठ्या प्रमाणात केले जात आहेत.


हेही वाचा – एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप; शरद पवार, देवेंद्र फडणवीस आहेत कुठे?