घरताज्या घडामोडीभारतावर पुन्हा कोरोनाचे सावट! 24 तासांत कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ

भारतावर पुन्हा कोरोनाचे सावट! 24 तासांत कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ

Subscribe

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,793 नवीन रूग्ण आढळले असून कोरोनामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात सध्या कोरोनाचे 96,700 सक्रिय रूग्ण आहेत

सध्या भारतात कोरोना पुन्हा आपली मान वर करू लागला आहे. दिवसेंदिवस पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात कोरोना रूग्णांची पुन्हा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,793 नवीन रूग्ण आढळले असून कोरोनामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात सध्या कोरोनाचे 96,700 सक्रिय रूग्ण आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या तासांमध्ये 24 ऐकूण 4,73,717 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 तसेच आत्तापर्यंत देशातील 197.31 कोटी लोकांचे लसीकरण झाले असून सध्या देशात 96,700 रूग्ण सक्रिय आहेत. तसेच गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,486 रूग्ण बरे झाले आहेत. देशातील आत्तापर्यंत 4,27,97,092 रूग्ण बरे झाले असून देशात 86.14 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

- Advertisement -

राज्यात बीए व्हेरिएंटचे रूग्ण आढळले
सध्या राज्यात बीए व्हेरिएंटचे 4 व्हेरिएंटचे 3 रूग्ण आढळले तर व्हेरिएंटचे 5 व्हेरिएंटचे 2 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये तीन पुरूष आणि २ स्रियांचा समावेश आहे. हे सर्व रूग्ण मुंबई येथील आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -