घरक्रीडाIND vs AUS : क्रिस लिनचा हा सिक्स पाहून तुम्ही व्हाल थक्क...

IND vs AUS : क्रिस लिनचा हा सिक्स पाहून तुम्ही व्हाल थक्क !

Subscribe

भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या क्रिस लिनने १०८ मीटरचा सिक्स मारला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना ब्रिस्बन येथे होत आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. फलंदाजी करताना सलामीवीर डार्सी शॉर्ट लवकर बाद झाला. त्यानंतर विस्फोटक फलंदाज क्रिस लिन मैदानात उतरला. त्याने या डावातील सातवे षटक खलील अहमदने टाकले. या षटकातील चौथ्या चेंडूवर लिनने १०८ मीटरचा षटकार लगावला. जो थेट स्टँड्समध्ये जाऊन पडला. लिनने एकूण २० चेंडूंत ४ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने ३७ धावा केल्या.

भारताला १७४ धावांचे आव्हान 

पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना १७ षटकांचा करण्यात आला. या १७ षटकांत ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५८ अशी धावसंख्या केली. यामध्ये लिनच्या ३७, मॅक्सवेलच्या ४६, मार्कस स्टोइनिसच्या ३३ आणि फिंचच्या २७ धावांचा वाटा होता.
- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -