घरताज्या घडामोडीमुंबईत मुसळधार पावसाचा धुमाकूळ, तुळशी आणि विहार तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ

मुंबईत मुसळधार पावसाचा धुमाकूळ, तुळशी आणि विहार तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ

Subscribe

गेल्या रविवारपासून मुंबई शहर व उपनगरे परिसरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. हवामान खात्याने तर गुरुवारी शहर व उपनगरात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र तसे काही झाल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे आज सकाळच्या सत्रात थोडीफार बरसात केल्यावर दुपारनंतर संपूर्ण दिवसभर पावसाने विश्रांती घेतली.

पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते सायंकाळी ४ या कालावधीत शहर भागात फक्त -१४ मिमी, पश्चिम उपनगरात – ९ मिमी तर पूर्व उपनगरात – १७ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, शहर भागात ७ ठिकाणी, पूर्व उपनगरात – १२ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – १९ ठिकाणी अशा एकूण ३८ ठिकाणी झाडे/ फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे समजते.

- Advertisement -

तसेच, शहर भागात २ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात १ ठिकाणी अशा ३ ठिकाणी घरे, भिंती पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे, पूर्व उपनगरात – १ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात २ ठिकाणी अशा एकूण ३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, मुंबईतील तुळशी व विहार या दोन तलावांत सकाळच्या सत्रात थोडाफार पाऊस पडला. त्यामुळे तलावातील पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाली. मात्र रात्री ८ नंतर पुन्हा एकदा पावसाने आपली रिपरिप सुरू केली.


हेही वाचा : शिवसेनेत उठाव करणं गरजेचं होतं, आमदार सदा सरवणकरांची

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -