घरमुंबईजलवाहिनी दुरुस्तीसाठी माटुंगा ते लालबाग परिसरातील पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी दुरुस्तीसाठी माटुंगा ते लालबाग परिसरातील पाणीपुरवठा बंद

Subscribe

दादरमधील पारसी जिमखान्यासमोर जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी ८ जुलै रोजी महापालिकेच्या एफ/दक्षिण आणि एफ/उत्तर विभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

दादरमधील पारसी जिमखान्यासमोर जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी ८ जुलै रोजी महापालिकेच्या एफ/दक्षिण आणि एफ/उत्तर विभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. (Water supply from Matunga to Lalbaug area closed for water supply repair)

त्यानुसार, माटुंगा, शिवडी, वडाळा, काळाचौकी, नायगाव, दादर, परळ, लालबाग परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

- Advertisement -

दादर (पूर्व) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखाना समोर १२०० मिमी व्यासाची (न्यू तानसा) जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम जलकामे विभागाद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

ही जलवाहिनी फुटल्याचा परिणाम म्हणून शुक्रवारी ८ जुलै २०२२ रोजी एफ / उत्तर विभागातील, दादर (पूर्व), माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी परिसरात आणि एफ/दक्षिण विभागातील, दादर, नायगाव, लालबाग, वडाळा, परळ, काळाचौकी, शिवडी आदी परिसरात सकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांत अपेक्षित व पुरेसा पाणीसाठा जमा झाल्याची खात्री पटल्यावर लवकरच १० टक्के लागू असलेली पाणी कपात मागे घेण्यात येईल, असे आश्वासन पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांत गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ७० टक्के कमी पाणीसाठा जमा झाल्याने पालिकेने २७ जूनपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू केली.मात्र या पाणी कपातीमुळे डोंगराळ भागात १० टक्के ऐवजी ३० टक्केपर्यन्त पाणी कपात होऊन त्याचा मोठा फटका नागरिकांना बसत असल्याची तक्रार भाजपच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे.


हेही वाचा – रेड, ऑरेंज अलर्टवेळी समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी; महापालिकेच्या मुंबईकरांना सूचना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -