घरदेश-विदेशहे भाजपाच्या परंपरेला साजेसचं - राहुल गांधी

हे भाजपाच्या परंपरेला साजेसचं – राहुल गांधी

Subscribe

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, आयपीएस अधिकारी दिनेश एमएन, राजुकामार पांड्या आणि डीडी वंजारा हे या एन्काऊंटर प्रकरणातील मुख्यसुत्रधार आहेत.

तुलसीराम प्रजापती फेक एन्काऊंटर प्रकरणामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, आयपीएस अधिकारी दिनेश एमएन, राजुकामार पांड्या आणि डीडी वंजारा हे मुख्य सुत्रधार असल्याचा दावा मुख्य तापस अधिकाऱ्यांनी केला. बुधवारी स्पेशल कोर्टामध्ये तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी कोर्टासमोर हा दावा केला. दरम्यान याच प्रकरणावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत तुलसीराम प्रजापती यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असणे हे भाजपाच्या परंपरेला साजेसेच आहे. सत्य कधीच लपत नाही आणि तुम्ही सत्यापासून लांब जाऊ शकत नाही असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

२००६ ला गुजरातमध्ये झालेल्या तुलसीराम प्रजापती फेक एन्काऊंटर प्रकरणाचा तपास संदीप तामगडे करत होते. संदीप तामगडे यांनी स्पेशल कोर्टामध्ये बुधवारी दावा केला की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, आयपीएस अधिकारी दिनेश एमएन, राजुकामार पांड्या आणि डीडी वंजारा हे या एन्काऊंटर प्रकरणातील मुख्यसुत्रधार आहेत. एप्रिल २०१२ पासून संदीप तामगडे याप्रकरणाचा तपास करत आहेत. अमित शहा आणि राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी २००४ मध्ये प्रसिध्द बिल्डरच्या ऑफिसमध्ये आग लावण्यासाठी सोहराबुद्दीन शेख, तुलसीराम आणि आजम खान सारख्या आरोपींचा वापर केला होता. अमित शाह, कटारिया, दिनेश एमएन, राजकुमार पांड्या आणि वंजारा हे या प्रकरणातील आरोपी आहेत.

तामडेंनी कोर्टात दिली ही माहिती

मुख्य तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी असा दावा केला आहे की, आरोपींच्या कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) वरुन असे सिध्द होते की, त्यांनीच या गुन्ह्याचा कट रचला होता. तामगडे यांना कोर्टाने विचारले की, कोणत्या सीडीआरचा तपास करताना काही कटाची माहिती मिळाली का, तर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, क्रॉस एग्डमिनेशनच्या दरम्यान अधिकारी यासाठी सहमत झाले की, सीडीआर एखाद्या विशेष काळी कोणत्याही व्यक्तीचे स्थळाचा तपास लावण्यासाठी एक महत्वाचा पुरावा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -