घरटेक-वेकसॅमसंगने मागितली कर्मचाऱ्यांची माफी, जाणून घ्या कारण

सॅमसंगने मागितली कर्मचाऱ्यांची माफी, जाणून घ्या कारण

Subscribe

सॅमसंगने माफीसोबतच मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची नुकसान भरपाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी १०० कोटीहून अधिक किमतीची तरतूद केली आहे.

सॅमसंगसारख्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक कंपनीने चक्क कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. शुक्रवारी त्यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागितली असून या मागचे कारण ऐकाल तर तुम्हाला धक्काच बसेल. सॅमसंगच्या साऊथ कोरिया येथील सेमीकंडक्टर फॅक्टरीमधील कर्मचाऱ्यांना सॅमसंगमुळे कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहेत. कॅन्सरशिवाय अन्य आजारांची लक्षणे देखील काही कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आली आहेत. त्यामुळे कंपनीने माफी मागितल्याचे देखील समजले आहे.

वाचा- आला सॅमसंगचा गॅलेक्सी A9

आतापर्यंत ११८ जणांचा मृत्यू

२००७ साली साऊथ कोरियामध्ये ही फॅक्टरी सुरु करण्यात आली. त्यानंतर येथे रुजू झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या तक्रारी होत्या. आतापर्यंत एकूण ११८ जणांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना १६ वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरची लागण झाली होती. याशिवाय गर्भपात, थकवा असे काही आजारही झाले आहेत. सॅमसंगने १० वर्षातील कंपनीचा अभ्यासक करुन तो सादर करत कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांना देणार नुकसान भरपाई

सॅमसंगने माफीसोबतच मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची नुकसान भरपाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी १०० कोटीहून अधिक किमतीची तरतूद केली आहे. ती मदत लवकरच कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -