घरCORONA UPDATEराज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांवरच, मृत्यूदरही स्थिरावला

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांवरच, मृत्यूदरही स्थिरावला

Subscribe

आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे. कालही पुण्यात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण आढळले होते.

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे २ हजार २८९ नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांचा आकडा दोन हजारांवरच अडकला आहे. तर, २४०० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७८ लाख ६४ हजार ८३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (Corona Update from Maharashtra)

आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे. कालही पुण्यात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर, दुसरीकडे राज्यात सहा कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्के झाला आहे. तसंच, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.९७ टक्के आहे.

- Advertisement -

राज्यात सध्या १४ हजार ५१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर, पुण्यात ५ हजार १२५ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तसेच, १९३७ रुग्णांवर मुंबईत उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांवरच अडली असली तरीही देशातील आजची आकडेवारी कालपेक्षा किंचित वाढलेली दिसत आहे. गेल्या २४ तासांत दशात २० हजार ५५७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर, ४० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या देशात १ लाख ४५ हजार ६५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – भारताचा कोरोना लसीकरणाचा २०० कोटींचा टप्पा पार; पंतप्रधान मोदींचे बिल गेट्सकडून कौतुक

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -